शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
2
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
3
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
4
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
5
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
6
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
7
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
8
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
9
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
10
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम
11
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
12
Sex Education: १० वर्षांखालील मुलांना लैंगिक शिक्षणाची माहिती किती आणि कशी द्यावी? 
13
"माझी पत्नी सापडली का?" पोलिसांना रोज विचारायचा; स्वत:च रचलेला हत्येचा भयंकर कट अन्...
14
"पार्थ पवारांचा राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच घात केला, काही नवीन नाही"; शिंदे गटाच्या आमदाराचा मोठा गौप्यस्फोट
15
मुंबईच्या नालासोपारा स्टेशनवर लोकलची वाट पाहत उभे होते 'हे' सेलिब्रिटी, ओळखलंत का?
16
काय सांगता! ट्रम्प आता प्रत्येक अमेरिकन नागरिकाला २ हजार डॉलर्स देणार; नेमका प्लान काय?
17
डोक्यात क्रिकेटची बॅट हाणली, 'ती' ओरडत राहिली पण तो थांबला नाही; व्यावसायिकाने पत्नीला संपवले
18
महिलांमध्ये झपाट्याने वाढतेय फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण, प्रदूषण हेच मोठे कारण
19
पीपीएफमधून दरमहा कमवा १ लाखाहून अधिक करमुक्त उत्पन्न! किती करावी लागेल गुंतवणूक?
20
"चांगलं बोलता येत नसेल तर तोंड बंद ठेवा", ऐश्वर्याच्या ट्रोलिंगवरुन भडकली रेणुका शहाणे

भाजपच्या सत्तेत राममंदिर का नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 23:52 IST

मुरगूड : सत्तेच्या जोरावर तलाकसाठी कायद्यात बदल करता, आरक्षणासाठी घटना दुरूस्ती करून प्रश्न मार्गी लावता. मग तुमची सत्ता असताना ...

मुरगूड : सत्तेच्या जोरावर तलाकसाठी कायद्यात बदल करता, आरक्षणासाठी घटना दुरूस्ती करून प्रश्न मार्गी लावता. मग तुमची सत्ता असताना कोट्यवधी लोकांच्या अस्मितेचा प्रश्न बनलेल्या राममंदिरासाठी तुम्हाला का निर्णय घेता येत नाही, या प्रश्नाचे भाजपने उत्तर द्यावे, असा घणाघात परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी भाजपवर केला.मुरगूड (ता. कागल) येथे शिवसेना कार्यकर्ते, बूथ व गटप्रमुखांच्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवसेना सहसंपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक होते. यावेळी मुरगूड नगरपालिकेच्यावतीने रमाई आवास अनुदान धनादेश वाटप, बचतगटांना सानुग्रह अनुदान वाटप, शौचालय अनुदान मंजुरीपत्र यांचे वितरण करण्यात आले. जिल्हा नियोजन मंडळावर निवडीबद्दल संभाजी भोकरे, ‘खेलो इंडिया’ स्पर्धेत ब्राँझपदक पटकावलेल्या स्वाती शिंदे यांचा यावेळी सत्कार करण्यात आलारावते पुढे म्हणाले, भाजपला महाराष्ट्रात कोण ओळखत नव्हते. शिवसेनेच्या माध्यमातून तुम्ही गावागावांत पोहोचवला. गटप्रमुख, बूथप्रमुखांनी प्रामाणिकपणे काम केल्यास जिल्ह्यात खासदारकीबरोबर सहा ते आठ आमदार सेनेचे असणार आहेत. शिवसैनिकांत आत्मविश्वास असावा; पण अतिआत्मविश्वास बाळगू नका, असा सल्ला त्यांनीदिला. शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर म्हणाले, शिवसेना घराघरांत पोहोचण्यासाठी शिवसैनिकांनी बांधणी करावी. यंदा कोल्हापूरमधून संजय मंडलिकांना दिल्लीच्या तख्तावर नेवून ठेवल्याशिवाय शिवसैनिक गप्प बसणार नाही. कार्यकर्तेच विजयाची जबाबदारी खांद्यावर घेतील.यावेळी संजय मंडलिक म्हणाले, शिवसेनेत एक शिस्त आहे. रोजगार देण्यापासून गोरगरिबांचे प्रश्न सोडविण्यापर्यंत शिवसेना कार्यरत आहे. त्यामुळेच कागल तालुक्यात गटातटापलीकडे शिवसेना पोहोचली आहे. मी खासदार झाल्यावरच विकास झाला आहे, असे म्हणणाऱ्या विद्यमान खासदारांनी जिल्ह्याचा इतिहास समजून घ्यावा, असा टोलाही त्यांनी महाडिकांना लगावला. बालेकिल्ला मुंबईपाठोपाठ कोल्हापूर जिल्हा भगवा करायचा आहे. शिवसैनिकांच्या प्रबळ प्रयत्नांनी यावेळी यश हमखास मिळणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.यावेळी माजी आमदार संजय घाटगे, मंडलिक युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अ‍ॅड. वीरेंद्र मंडलिक, नगराध्यक्ष राजेखान जमादार यांचीही भाषणे झाली. यावेळी हर्षल सुर्वे, संदीप पाटील, तालुकाप्रमुख अशोक पाटील, पंचायत समिती उपसभापती विजय भोसले, जि. प. सदस्या शिवानी भोसले, जिल्हा महिला संघटक प्रमुख संध्यादेवी माळवीकर, विद्या गिरी यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत उपनगराध्यक्ष नामदेवराव मेंडके यांनी केले. शिवसेना उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन सुनील डेळेकर यांनी केले.