जयसिंगपुरात भाजपकडून योगदिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:16 IST2021-06-22T04:16:55+5:302021-06-22T04:16:55+5:30

जयसिंगपूर : शहरातील भाजपकडून योगदिन साजरा करण्यात आला. रोटरी सभागृह व येसूवाहिनी सावरकर बाल मंदिर, सुदर्शन चौक येथे ...

BJP celebrates Yog Day in Jaysingpur | जयसिंगपुरात भाजपकडून योगदिन साजरा

जयसिंगपुरात भाजपकडून योगदिन साजरा

जयसिंगपूर : शहरातील भाजपकडून योगदिन साजरा करण्यात आला. रोटरी सभागृह व येसूवाहिनी सावरकर बाल मंदिर, सुदर्शन चौक येथे योगासनांची प्रात्यक्षिके करण्यात आली.

प्रारंभी स्वागत भाजप मंडल अध्यक्ष रमेश यळगुडकर यांनी करुन योगदिनाचे महत्त्व सांगितले. योगामुळे संपूर्ण शरीर निरोगी बनते, मन कणखर बनते, असेही त्यांनी यावेळी सांगितले. योगा प्रात्यक्षिके करण्यात आली. योगशिक्षक दीपक अणेगिरीकर व स्वरूप सूर्यवंशी यांनी उपस्थितांकडून योगासने करुन घेतली.

यावेळी नगराध्यक्ष डॉ. नीता माने, मिलिंद भिडे, संतोष जाधव, विनायक अणेगिरीकर, कुलदीप देशपांडे, कुमार हतळगे, पंकज गुरव, रोहित बागडी, योगेश अंधारे, योगेश देशपांडे, संजय चौगुले, विनय पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. राजेंद्र दाईंगडे यांनी आभार मानले.

फोटो - २१०६२०२१-जेएवाय-०१

फोटो ओळ - जयसिंगपूर येथे भाजपकडून योगदिन साजरा करण्यात आला.

Web Title: BJP celebrates Yog Day in Jaysingpur