शहरं
Join us  
Trending Stories
1
जनरल झेडच्या आंदोलनामुळे आणखी एका देशात सत्तापालट!
2
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
3
रुग्णालयात नेताना आजारी मुलाचा वाटेतच मृत्यू; धक्क्याने वडिलांनीही सोडले प्राण!
4
आरमोरी मार्गावर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दोन भाऊ जागीच ठार!
5
सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक'
6
निवडणूक न लढवताही कार्यकर्ते झेडपी, पंचायत समितीचे सदस्य बनणार? बावनकुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
7
भारत-पाक सामना बरोबरीत सुटला! मग दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जे घडलं ते चर्चेत
8
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
9
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
10
‘पात्र गावांना सामूहिक वनहक्क देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी’, अजित पवार यांचे आदेश
11
IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
12
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
13
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
14
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
15
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
16
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
17
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   
18
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक
19
वेस्ट इंडीजच्या नाकी नऊ आणणाऱ्या रवींद्र जडेजाची सचिन-सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी!
20
'आयटीआय'मध्ये मंत्र शिकवणार अन् कुंभमेळ्यात पौरोहित्य करणार; नवा अभ्यासक्रम सुरू

जिल्ह्यात कोरोना साहित्य खरेदीत ३५ कोटींचा घोटाळा, भाजपाचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 16:43 IST

Bjp Kolhapur-कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना साहित्याची ८८ कोटींची खरेदी करण्यात आली. चढ्या दराने सर्वच साहित्य खरेदी करण्यात आली. राजकीय वरदहस्ताने या खरेदीत ३५ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप मंगळवारी भाजपने पत्रकार परिषदेत केला. 

ठळक मुद्देजिल्ह्यात कोरोना साहित्य खरेदीत ३५ कोटींचा घोटाळा राजकीय वरदहस्ताने खरेदीत भ्रष्टाचार -भाजपाचा आरोप

कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना साहित्याची ८८ कोटींची खरेदी करण्यात आली. चढ्या दराने सर्वच साहित्य खरेदी करण्यात आली. राजकीय वरदहस्ताने या खरेदीत ३५ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप मंगळवारी भाजपने पत्रकार परिषदेत केला. भाजपचे जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन कोरोना साहित्यातील घोटाळ्यासंदर्भातील तपशील प्रसार माध्यमांसमोर मांडला केला. यावेळी किसान सभेचे अध्यक्ष भगवान काटेही उपस्थित होते. निंबाळकर म्हणाले, ८८ कोटी रुपयांची खरेदी करण्यात येऊन त्याची बिले अदा करण्यात आली आहेत. आणखी ४५ कोटी रुपयांची मागणी केली आहे. मात्र ही सर्व खरेदी शासनाचे नियम डावलून मनमानी पद्धतीने करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, शल्यचिकित्सक यांच्या समितीने ही खरेदी केली आहे.

समितीचे सहअध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल व कंत्राटी आरोग्य अधिकारी नितीन लोहार यांच्या स्वाक्षरीने बिले देण्यात आली आहेत. अनेक पात्र कंपन्यांना डावलून राजकीय हितसंबंध असणाऱ्या लोकांच्या कंपन्यांकडून खरेदी केली असल्याचे आरोप भाजपाने केले आहेत.थर्मल स्कॅनरची किंमत अकराशे रुपये असताना ते दहा हजार रुपयांना खरेदी करण्यात आले. मास्क सुरुवातीला दोनशे पाच रुपयांनी खरेदी केले नंतर ते केवळ १४ रुपयाला खरेदी केली. हँडसनीटायझर सुद्धा प्रारंभी अडीचशे रुपये अर्धा लिटर खरेदी केले तर नंतर ते ६० रुपये लीटरला खरेदी केले. पीपीई किटमध्ये ही मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला आहे. बाजारात तीनशे पन्नास रुपयाला कीट मिळत असताना येथे सतराशे रुपयांनी खरेदी केलेली आहे.

जिल्ह्यात साडेतीन हजार बेड खरेदी केले आहेत. बाजारात सात हजार २२५ रुपयांना बेड मिळत असताना साडेबारा हजार रुपये प्रती बेड दराने खरेदी केली आहे. कोरोना संसर्ग वाढला असताना जिल्ह्यात रुग्णांना बेड उपलब्ध नाही असे सांगितले जात होते. मग इतक्या मोठ्या प्रमाणात खरेदी केलेले बेड गेले कुठे? जिल्हा परिषद सदस्यांच्या पुतण्याला बेड अभावी जीव गमवावा लागला होता. त्यामुळे बेडच्या नियोजनात कोणाचा कोणावर वचक नव्हता. लोकांची थट्टा करण्याचे काम प्रशासनाने केले आहे,अशी टीका निंबाळकर यांनी केली.ऑक्सीजन सिलेंडर नऊ हजार ५७४ ला मिळत असताना ते १३ हजार ७०० रुपयांना खरेदी केले आहे. अशा अनेक वस्तूंमध्ये चढ्या दराने खरेदी करून मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार केला आहे.एकूण खरेदी ८८ कोटींची झाली आहे. त्यामध्ये ३५ ते ४० टक्के रकमेचा घोटाळा झाला आहे. राजकीय नेत्यांच्या वरदहस्त असल्याने ३५ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप निंबाळकर यांनी केला.

शासनाच्या पोर्टलवर कमी दराने साहित्य मिळत असताना गडबडीने चढ्या दराने खरेदी करून करदात्या जनतेच्या लूट उघडपणे झाली असून त्याची चौकशी करावी अशी मागणी आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. या प्रकरणाची चौकशीचे निवेदन अमित शहा, देवेंद्र फडणवीस,चंद्रकांत पाटील यांना दिले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही यासंदर्भातील मेल केला आहे, असे ते म्हणाले.

टॅग्स :BJPभाजपाkolhapurकोल्हापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याzpजिल्हा परिषद