शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

शहरात पुन्हा चुकून आला गवा.. पण माणसांना अकलेचा डोस कुणी द्यावा ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2021 18:07 IST

खरं तर पहिल्यांदा भिती या गोष्टीची वाटतेय की कोल्हापूरात पुण्यात चार महिन्यांपूर्वी घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये.

खरं तर पहिल्यांदा भिती या गोष्टीची वाटतेय की कोल्हापूरात पुण्यात चार महिन्यांपूर्वी घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये. कारण पुण्यात अतिउत्साही मुर्ख लोकांच्या बघ्यांच्या गर्दीने गव्याला पळवून पळवून दमवून त्याचा जीव घेतला होता. कोल्हापूर शहरामध्ये गवा आलाय ही बातमी वाऱ्यासारखी पसरली असल्यामुळे आमच्या भागातील बघ्यांची गर्दी पंचगंगा नदीच्या दिशेने जाऊ लागल्याने धास्ती आणखीनच वाढली.तिथे जाणाऱ्या मित्रांबरोबरच काही लोकांनी मला विचारलंच, गवा पकडायला तुम्ही गेला नाही ?गवा पकडायला कशाला हवाय, त्याला परत पाठवण्यासाठी वनविभाग आणि रेस्क्यू टीम त्यांचं कार्य करत असताना बघ्यांच्या गर्दीतील एक म्हणून आम्ही कशाला गर्दी वाढवायची.. असं सांगून तुम्हीही उगाच गर्दी करायला तिथे जाऊ नका हे सांगण्याचा प्रयत्न केला, पण निघण्याच्या पूर्ण तयारीत असणाऱ्या गाड्या मागे वळल्या नाहीत. म्हणूनच म्हणावसं वाटलं, शहरात पुन्हा चुकून आला गवा.. पण माणसांना अकलेचा डोस कुणी द्यावा ?त्यावेळी मात्र बाबा आमटेंच्या बोलण्याची आठवण झाली, आमटे परिवारानं जेव्हा आदिवाश्यांच्या साठी कार्य करायचं ठरवलं तेव्हा पहिल्यांदा ते जंगलात गेल्यानंतर शर्ट पँन्ट घातलेलं आणि आपल्यापेक्षा वेगळं कुणीतरी दिसतय म्हणून काहीजण घाबरून पळायचे, तर काहीजण उत्सुकतेपोटी विनाकारण गर्दी करायचे आणि नंतर त्यांच्या समुदायातील लोकांनाही ते दाखवायला हळूहळू घेऊन यायचे. रोज प्राण्यांची शिकार करून पोट भरणाऱ्या आदिवाश्यांच्या विचारांमध्ये नंतर आमटे परिवाराने बदल सुध्दा केला आणि वन्यजीवांचे मोठ्या प्रमाणात संरक्षण झाले.आज त्या घटनेला कित्येक वर्ष उलटली.. ते जंगलातील अशिक्षित आदिवासी सुधारले, ज्या जनावरांना मारून स्वतःचे पोट भरायचे त्याच जनावरांचे जीव भुतदयेसाठी वाचवू लागले. पण शहरातील सुशिक्षित लोकांचं काय ? आदिवासी तर अज्ञानापायी आणि  उत्सुकतेपोटी गर्दी करायचे, पण चुकून शहरात आलेल्या वन्यजीवाला बघायला गर्दी करून आणि गोंधळ घालून त्या मुक्या जीवाला दमवून त्याचा जीव घ्यायचा ही शहरातील सुशिक्षितांची कसली अघोरी मानसिकता ?रानगवा दिसताना जरी भारदस्त आणि भक्कम दिसत असला तरी त्याचे हृदय खूप नाजूक असते. अहो माणसाच्या हृदयावर सुध्दा एखाद्या ऐकीव गोष्टीचा परिणाम होतो आणि भितीने कधीतरी जीव सुध्दा जातो. इथे तर शेकडो लोक या बिचाऱ्या मुक्या जीवाच्या समोर जमून हातात काठ्या घेऊन, आरडाओरडा करत, काही अतिशहाणे लांबून दगडफेक करत असतात. त्याच्या जीवाचे भितीने काय हाल होत असतील याचा तरी विचार करा !फिरतं जनावर आहे, वनविभाग त्याला आलेल्या मार्गे किंवा दुसऱ्या मार्गे पुन्हा वनात त्याच्या अधिवासात पाठवण्यासाठी मार्ग दाखवेलच, पण तुमच्या मोबाईल मध्ये फोटो व्हिडीओ करण्याच्या नादात आणि गर्दीच्या गोंधळात त्याचा जीव घेऊ नका !प्राणीमित्रधनंजय वामन नामजोशी (नाना)

टॅग्स :kolhapurकोल्हापूर