बस्तवडे परिसरात सामाजिक उपक्रमांनी मंडलिकांचा वाढदिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:24 IST2021-04-16T04:24:27+5:302021-04-16T04:24:27+5:30

बस्तवडे येथील दत्तगुरू सहकारी दूध संस्थेच्यावतीने सभासदांसह ग्रामस्थांना सॅनिटायझर व मास्कचे वाटप माजी सरपंच साताप्पा कांबळे, संस्थेचे अध्यक्ष शिवाजी ...

Birthdays of congregations through social activities in Bastawade area | बस्तवडे परिसरात सामाजिक उपक्रमांनी मंडलिकांचा वाढदिवस

बस्तवडे परिसरात सामाजिक उपक्रमांनी मंडलिकांचा वाढदिवस

बस्तवडे येथील दत्तगुरू सहकारी दूध संस्थेच्यावतीने सभासदांसह ग्रामस्थांना सॅनिटायझर व मास्कचे वाटप माजी सरपंच साताप्पा कांबळे, संस्थेचे अध्यक्ष शिवाजी पाटील, जी. एल. पाटील, सदाशिव वायदंडे, जनार्दन पाटील आदी मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले.

यावेळी गंगाधर शिंत्रे, बी. जी. चिखलकर, विष्णू वांगळे, आर. डी. भोसले, कृष्णात पाटील, प्रवीण पाटील, विश्वजित पाटील, धनंजय पाटील, पांडुरंग वांगळे, अशोक भोसले आदी उपस्थित होते.

म्हाकवे येथे मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करताना डॉ. विजय चौगुले, ग्रामपंचायत सदस्य अशोक चौगुले, वसंत पाटील, दिनेश पाटील, सुनील देवडकर, बाळासाहेब चौगुले, भाऊ पाटील, कृष्णात पाटील, सदा साखर कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

शेंडूर येथे शाळा व्यवस्थापनचे अध्यक्ष विकास कासोटे, उपाध्यक्ष लक्ष्मण मेथे यांच्याहस्ते शालेय विद्यार्थ्यांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप झाले. यावेळी सदा साखरचे संचालक शिवाजीराव इंगळे, दत्ता पोवार, आनंदा पोवार, मधू माने, प्रताप इंगळे, संतोष मोरे, आनंदा कुंभार, शहाजी पोवार, पंडित कांबळे, मधू कदम, रामचंद्र मोहिते, मारुती मेथे, बिरू बंडगर आदी उपस्थित होते.

कॅप्शन

बस्तवडे येथील दत्तगुरू दूध संस्थेकडून खा. मंडलिक यांच्या वाढदिवसानिमित्त सॅनिटायझर व मास्कचे वाटप करताना शिवाजी पाटील, जी. एल. पाटील, जनार्दन पाटील, सदाशिव वायदंडे, विष्णू वांगळे आदी.

Web Title: Birthdays of congregations through social activities in Bastawade area