कोल्हापूर : संचारबंदी कालावधीत भर रस्त्यावर समुहाने एकत्र येऊन वाढदिवस साजरा करताना तलवारीचा वापर करुन केक कापण्यात आला. हा प्रकार रोखण्याचा प्रयत्न करणाºया पोलीस मुख्यालयातील जलदगती प्रतिक्षादलाच्या पोलीसाला चक्क धक्काबुक्की करण्यात आली. हा प्रकार माऊली पुतळ्यानजीक दौलतनगर परिसरात मंगळवारी रात्री उशीरा घडला. या प्रकरणी राजारामपूृरी पोलिसांनी सराईत सहा गुन्हेगारावर गुन्हे नोंदवले आहेत.
ऋषिकेश उर्फ गेंड्या बाबासाहेब चौगुले, शंकर उर्फ अनुष्का (पूर्ण नाव नाही), नितीन उर्फ बॉब दिपक गडीयल, अर्जुन ठाकुर, पंकज पोवार, यश काकरे (सर्व रा, नवशा मारुती मंदीर परसर, दौलतनगर, राजारामपूरी) अशी गुन्हा नोंदविलेल्यांची नावे आहेत. बंदोबस्तातील पंकज बारड यांनी या युवकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्या युवकांनी थेट पोलीस बारड यांनाच धक्काबुक्की करत शिवीगाळ केली. हे सर्व पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले.