राधानगरी/कोल्हापूर : कोल्हापूरवन्यजीव विभाग आणि बायसन नेचर क्लबमार्फत आयोजित पक्षी निरिक्षण भ्रमंतीला गुरुवारी निसर्गप्रेमींकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. पक्षी सप्ताहानिमित्त हा उपक्रम राबविण्यात येत आहे.राधानगरी अभयारण्याच्या हत्तीमहाल परिसरात पक्षी निरीक्षण भ्रमंती आयोजित करण्यात आली. यावेळी वेडा राघू, बुलबुल, कवडा, पारवा, कोतवाल, गप्पीचा हळद्या, जंगली कावळा, भोरड्या, राधी धनेश, चकाचूर, दयाल, राज्यपक्षी हरियाल यासह राधानगरीचे वैशिष्ट्य असलेला शेकरु पक्षीमित्रांना पहायला मिळाले. यावेळी सुमारे २३ प्रकारच्या फुलपाखरांचे अवलोकन करण्यात आले. शिवाय संकटग्रस्त आणि प्रदेशनिष्ठ वनस्पतींची माहिती घेतली.कोल्हापूरवन्यजीव विभागाचे विभागीय वनाधिकारी विशाल माळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. वन्यजीव मंडळाचे सदस्य सुहास वायगंनकर यांनी यावेळी वनस्पती आणि पक्षी सहसंबंध, झाडांचा आणि पक्ष्यांचा संबंध, पक्ष्यांची नोंद कशी करावी, पक्षी निरिक्षण करताना काय काळजी घ्यावी, निकष कोणते या विषयावर मार्गदर्शन केले.या वेळी पणोरीचे सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर सूर्यवंशी, अनिल बडदारे, बायसन नेचर क्लबचे सम्राट केरकर, रुपेश बोबाडे, अनिल चव्हाण यांच्यासह वनक्षेत्रपाल नवनाथ कांबळे, वन्यजीव कर्मचारी, विविध शाळांचे विद्यार्थी तसेच निसर्गप्रेमी उपस्थित होते. वनपाल अंबाजी बिºहाडे यानी आभार मानले.
पक्षी निरिक्षण भ्रमंतीला राधानगरीत प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2020 17:54 IST
wildlife, radhanagari, kolhapur, forest department कोल्हापूर वन्यजीव विभाग आणि बायसन नेचर क्लबमार्फत आयोजित पक्षी निरिक्षण भ्रमंतीला गुरुवारी निसर्गप्रेमींकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. पक्षी सप्ताहानिमित्त हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
पक्षी निरिक्षण भ्रमंतीला राधानगरीत प्रारंभ
ठळक मुद्देपक्षी निरिक्षण भ्रमंतीला राधानगरीत प्रारंभनिसर्गप्रेमींचा प्रतिसाद : वन विभागाचे आयोजन