मेरी वेदरवर आजपासून ‘बिल्डो २०१४’ प्रदर्शन
By Admin | Updated: December 12, 2014 00:36 IST2014-12-12T00:16:31+5:302014-12-12T00:36:20+5:30
हे प्रदर्शन पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत मोठे प्रदर्शन असून, त्यामध्ये पुणे, मुंबई, गोवा, बेळगाव, बंगलोर येथील नामवंत कंपन्या सहभागी

मेरी वेदरवर आजपासून ‘बिल्डो २०१४’ प्रदर्शन
कोल्हापूर : येथील असोसिएशन आॅफ आर्किटेक्टस अॅँड इंजिनिअर्स या संस्थेच्या ‘बिल्डो २०१४’ या बांधकामविषयक प्रदर्शनास उद्या, शुक्रवारपासून प्रारंभ होत आहे. सोमवार (दि. १५)पर्यंत चालणारे हे प्रदर्शन पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत मोठे प्रदर्शन असून, त्यामध्ये पुणे, मुंबई, गोवा, बेळगाव, बंगलोर येथील नामवंत कंपन्या सहभागी झाल्या, अशी माहिती आज, गुरुवारी असोसिएशनचे अध्यक्ष संदीप घाटगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. मेरी वेदर मैदानावर उद्या, शुक्रवारी सायंकाळी चार वाजता उद्योजक संजय घोडावत यांच्या हस्ते आणि श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या अध्यक्षतेखाली प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. प्रदर्शन सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेत खुले राहणार आहे. बांधकाम क्षेत्राला लागणारे साहित्य स्टील, सिमेंट, आर.एम.सी. प्लॅँट, वॉटर प्रुफिंग कंपाउंड, वेगवेगळ्या प्रकारच्या खिडक्या, दरवाजे, रेडिमेड प्लास्टर, इंटिरिअर मेटेरियल, वॉल टेक्स्चर्स, वॉल क्लॅडिंग, प्लायवूड, लॅमिनेट्स, कॉँक्रीट मिक्सर, ब्रेकर, आदी प्रकारच्या मशिनरी, बिल्डिंग आॅटोेमेशन, बिल्डर्सचे अद्ययावत बांधकाम प्रकल्प, अर्थसाहाय्य करणाऱ्या कंपन्या अशा क
ंपन्यांचा या प्रदर्शनात सहभाग असेल. पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष सुधीर राऊत, मिलिंद नाईक, उमेश कुंभार, शिवाजी पाटील, मधुकर पाटील, अभिजित जाधव, राजू सावंत, राहुल श्रेष्ठी, संजय आवटी, संग्राम शिंदे, रवी पाटील, विजय चोपदार, सुनील मांजरेकर, आदी उपस्थित होते.