दुचाकीस्वार गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:46 IST2021-02-21T04:46:54+5:302021-02-21T04:46:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : भरधाव वेगाने दुचाकी चालवून घसरुन पडल्याने युवक गंभीर जखमी झाला. नीलेश हुंसराम बटेजा (वय ...

दुचाकीस्वार गंभीर
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : भरधाव वेगाने दुचाकी चालवून घसरुन पडल्याने युवक गंभीर जखमी झाला. नीलेश हुंसराम बटेजा (वय २९, रा. नागाळा पार्क) असे जखमीचे नाव आहे. ही दुर्घटना धैर्यप्रसाद कार्यालय ते ताराराणी चौक मार्गावर घडली. जखमीच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्याच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शेकोटी शेकताना भाजून जखमी
कोल्हापूर : थंडीमुळे रात्रीच्यावेळी शेकोटी शेकत बसलेल्या एकाच्या कपड्याला आग लागून तो भाजून गंभीर जखमी झाला. उत्तम कुंडलिक सुतार (वय ३५, रा. सांगरुळ) असे जखमीचे नाव आहे. ही घटना करवीर तालुक्यातील सांगरुळ गावी घडली, जखमीवर येथील सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
युवकाचा मृत्यू
कोल्हापूर : राजारामपुरी पाचवी गल्ली येथे राहत्या घरी जिन्यात बेशुध्दावस्थेत सापडलेल्या युवकाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची घटना घडली. आकाश महादेव शिंगाटे (वय २७) असे त्याचे नाव आहे. रात्री बाहेरुन जेवून आल्यानंतर तो जिन्यातच पडला होता. शनिवारी सकाळी तो जिन्यात पडलेल्या अवस्थेत मिळून आला. त्याला बेशुध्दावस्थेत सीपीआर रुग़्णालयात दाखल केले, पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.