दुचाकी चोरट्यास अटक; दोन वाहने जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:30 IST2021-09-09T04:30:27+5:302021-09-09T04:30:27+5:30

कोल्हापूर : येथील मोतीनगरनजीकच्या एस,एस.सी. बोर्ड चौकात चोरीची दुचाकी विक्रीसाठी आलेल्या दुचाकी चोरट्यास पोलिसांनी अटक केली. दीपक आनंदा आकुर्डे ...

Bike thief arrested; Two vehicles seized | दुचाकी चोरट्यास अटक; दोन वाहने जप्त

दुचाकी चोरट्यास अटक; दोन वाहने जप्त

कोल्हापूर : येथील मोतीनगरनजीकच्या एस,एस.सी. बोर्ड चौकात चोरीची दुचाकी विक्रीसाठी आलेल्या दुचाकी चोरट्यास पोलिसांनी अटक केली. दीपक आनंदा आकुर्डे (वय २६ रा. राजेंद्रनगर झोपडपट्टी, कोल्हापूर) असे दुचाकी चोरट्याचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून सुमारे एक लाख रुपये किमतीच्या दोन दुचाकी जप्त केल्या. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलीस पथकाने बुधवारी दुपारी केली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मोतीनगरनजीक एस.एस.सी. बोर्ड चौकात एक चोरटा चोरीतील विनानंबर दुचाकी विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली, त्यानुसार त्या परिसरात सापळा रचला. दुपारी दीपक आकुर्डे हा विनानंबर सिल्व्हर रंगाची दुचाकी घेऊन चौकात आला. त्याला पोलीस पथकाने संशयावरून पकडले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीतून त्याने घराजवळही आणखी एक चोरीची दुचाकी उभी करून ठेवल्याची माहिती दिली, पोलिसांनी दोन्हीही दुचाकी जप्त केल्या. जप्त केलेल्या दोन्हीही दुचाकी त्याने राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतनू चोरल्याची कबुली दिली.

ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकातील पोलीस अंमलदार नेताजी डोंगरे, श्रीकांत मोहिते, वैभव पाटील, रणजित कांबळे, उत्तम सडोलीकर, रणजीत पाटील, संतोष पाटील, संजय पडवळ यांनी केली.

फोटो नं.०७०९२०२१-कोल-क्राईम०१(एलसीबी)

ओळ : कोल्हापूरात एस.एस.सी. बोर्ड चौकात स्थानिक गुन्हे अन्वषेण पोलीस पथकाने बुधवारी दुपारी सापळा रचून दुचाकी चोरटा दीपक आकुर्डे याला अटक केली.

080921\08kol_6_08092021_5.jpg

ओळ : कोल्हापूरात एस.एस.सी. बोर्ड चौकात स्थानिक गुन्हे अन्वषेण पोलीस पथकाने बुधवारी दुपारी सापळा रचून दुचाकी चोरटा दिपक आकुर्डे याला अटक केली.

Web Title: Bike thief arrested; Two vehicles seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.