शहरं
Join us  
Trending Stories
1
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
2
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
3
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
4
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
5
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
6
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
7
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
8
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
9
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
10
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
11
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
12
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
13
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
14
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
15
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
16
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
17
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
18
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
19
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
20
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?

बिग बॉस विजेत्या विशाल निकमने घेतले अंबाबाई अन् जोतिबाचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2022 18:53 IST

बिग बॉस मराठी'चं तिसऱ्या पर्वाचा विजेता विशाल निकमने आज नववर्षाच्या पहिल्या दिवशीच कोल्हापुरात येवून श्री. अंबाबाई व जोतिबाचे दर्शन घेतले.

कोल्हापूर : 'बिग बॉस मराठी' तिसऱ्या पर्वाचा विजेता विशाल निकमने आज नववर्षाच्या पहिल्या दिवशीच कोल्हापुरात येवून श्री. अंबाबाई व जोतिबाचे दर्शन घेतले. विजयानंतर विशालचे गावकऱ्यांनी जंगी मिरवणूक काढून स्वागत केले. यानंतर त्याने पंढरपूरला जात विठ्ठल- रूक्मिणीचे देखील दर्शन घेतले होते. यानंतर आज त्याने कोल्हापूरला भेट दिली.विशाल सोबत त्याचा मित्र विकास पाटीलही होता. त्यांनेही अंबाबाई व जोतिबाचे दर्शन घेतले. बिग बॉसच्या घरात या दोघांची मैत्री जमली. आता बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर या दोघांनी मिळून जोतिबाचे दर्शन घेतले आहे. यावेळी विशाल निकमने घोड्यावरून एक फेरफटका देखील मारला. याचे काही फोटो देखील समोर आले आहेत. छोट्या पडद्यावर यंदा 'बिग बॉस मराठी'चं तिसरं पर्व चांगलंच गाजलं. १०० दिवस घरात राहिलेल्या विशाल निकमने यात बाजी मारत बिग बॉसची ट्रॉफी जिंकली. यानंतर सोशल मीडियावर सर्वत्र 'विशाल'मय वातावरण झालं होते. चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रकारे त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. जोतिबा मालिकेत साकारली जोतिबाची भूमिका विशाल निकमने जोतिबा मालिकेत जोतिबाची भूमिका साकारली होती. या मालिकेने त्याला महाराष्ट्राच्या घराघरात पोहचवले. या मालिकेचे चित्रीकरण कोल्हापूरातच झाले आहे. बिग बॉसची ट्रॉफी जिंकल्यानंतर आज त्याने जोतिबाचे दर्शन घेतले आहे.विशाल निकम मुळचा सांगली जिल्ह्यातीलविशाल निकमचा जन्म 10 फेब्रुवारीला देवखिंडी या गावात झाला होता. हे गाव सांगली जिल्ह्यात आहे. विशालला अभिनयासोबतच फिटनेसची देखील आवड आहे. त्याने जोतिबा, साता जल्माच्या गाठी अशा मालिकांमध्ये काम केलं आहे. परंतु त्याला खरी ओळख बिग बॉस मराठीने मिळवून दिली आहे. बिग बॉस मराठीमुळे विशालला प्रचंड लोकप्रियता आणि प्रेक्षकांचं प्रेम मिळालं आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBigg Boss Marathiबिग बॉस मराठीVishal Nikamविशाल निकमMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर