शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘बडे गँग’ टोळीप्रमुख फरारी विलास बडे अटक. कोल्हापूर पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 10:43 IST

पुणे, बीड, सोलापूर जिल्ह्यांत धुमाकूळ घातलेल्या ‘बडे गँग’ या कुख्यात संघटित टोळीच्या प्रमुखाला कोल्हापूर पोलिसांनी सापळा रचून कोल्हापूर ते पुणे राष्ट्रीय महामार्गावर सांगली फाटा येथे अटक केली.

ठळक मुद्दे‘बडे गँग’ टोळीप्रमुख फरारी विलास बडे अटक. कोल्हापूर पोलिसांची कारवाई पुणे, बीड, सोलापूर जिल्ह्यात त्याने घातला धुमाकूळ

कोल्हापूर : पुणे, बीड, सोलापूर जिल्ह्यांत धुमाकूळ घातलेल्या ‘बडे गँग’ या कुख्यात संघटित टोळीच्या प्रमुखाला कोल्हापूर पोलिसांनी सापळा रचून कोल्हापूर ते पुणे राष्ट्रीय महामार्गावर सांगली फाटा येथे अटक केली. विलास महादेव बडे (वय २६, रा. चाटगाव, ता. माजलगाव, जि. बीड. सध्या रा. मुधोळ कर्नाटक) असे त्याचे नाव आहे. धारुर (जि. बीड) येथून पोलीस कोठडीत असताना पोलिसांना गुंगारा देऊन तो पळून गेला होता. त्याच्यावर ‘मोका’ अंतर्गत कारवाई प्रस्तावित होती, अशी माहिती पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी  दिली.देशमुख म्हणाले, बडे गँगचा प्रमुख विलास बडे हा साथीदारासोबत महामार्गावर वाहने अडवून त्यांना लुबाडत होता, त्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हे नोंद आहेत. त्याने पुणे, अहमदनगर, बीड, औरंगाबाद अशा विविध ठिकाणी रोड रॉबरीचे गुन्हे करताना शिक्रापूर पोलिसांनी त्याच्या टोळीच्या मुसक्या आवळल्या होत्या. याशिवाय या टोळीवर नेकनूर पोलीस ठाणे, युसुफ वडगाव पोलीस ठाणे, नेकनूर पोलीस ठाणे, बर्दापूर पोलीस ठाणे, धारुर पोलीस ठाणे या ठिकाणी रोड रॉबरीचे गुन्हे दाखल आहेत; त्यामुळे गुंड विलास बडे याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमांतर्गत (मोका) कारवाई प्रस्तावित होती.पोलीस कोठडीतून पलायनविलास बडे या गुंडाला धारुर पोलिसांनी अटक केली होती. त्यावेळी नोव्हेंबर २०१७ मध्ये तो पोलिसांच्या कोठडीतून पळून गेला होता. पोलीस त्याचा शोध घेत होते. त्याच्या पलायनाची माहिती बिनतारी संदेश व सोशल मीडियावरून प्रसिद्ध केली होती. त्या वेळेपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता.बसची वाट पाहताना पकडलेबडे या गुंडाची माहिती मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलिसांनी दोन पोलिसांची पथके तयार करून तपास सुरू ठेवला. विलास बडे हा गुंड सध्या कर्नाटकातील मुधोळ गावी राहण्यास असून, तो बुधवारी सांगली फाटा येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, त्यावरून पोलिसांनी कोल्हापूर ते पुणे राष्ट्रीय महामार्गावर शिरोलीनजीक सांगली फाटा येथे सापळा रचला. त्यावेळी सांगली फाटा येथे बडे हा प्रवाशांच्या गर्दीमध्ये लपून बसची वाट पहात होता. यावेळी त्याला चारही बाजूने गर्दीत घेरून त्याला अटक केली. त्यानंतर त्याला बीड पोलिसांच्या ताब्यात दिले. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर