शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
4
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
5
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
6
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
7
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
8
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
9
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
10
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
11
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
12
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
13
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
14
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
15
आयोग नव्हे, मतदारच राजा !
16
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
17
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
18
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
19
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
20
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?

एसटी बँक: कोट्यवधींच्या ठेवी परत मिळविण्याचे मोठे आव्हान, संचालकांच्या नव्या निर्णयांकडे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2024 13:58 IST

सचिन यादव कोल्हापूर : एसटी बँकेतील ४८० कोटी रुपयांच्या गेलेल्या ठेवी परत मिळविण्याचे मोठे आव्हान संचालकांच्या पुढे आहे. कारण ...

सचिन यादवकोल्हापूर : एसटी बँकेतील ४८० कोटी रुपयांच्या गेलेल्या ठेवी परत मिळविण्याचे मोठे आव्हान संचालकांच्या पुढे आहे. कारण ठेवी मिळाल्याशिवाय पुरेसा व्यवसाय होणार नाही. व्यवसाय नसेल तर बँक सुस्थितीत राहणार आहे. त्यामुळे ठेवी जाण्याने आर्थिक दुष्टचक्र सुरू झाले आहे. नव्याने सुरू केलेल्या ‘विशेष उत्सव योजने’तून किती ठेवी जमा होतील, याचा अंदाज अद्याप संचालकांना नाही. येत्या एप्रिल, मे, जून महिन्यात निवृत्त होणाऱ्या सभासदांकडून प्रॉव्हिटंड फंड, ग्रॅच्युइटीची सुमारे १५० कोटी रुपयांची रक्कम मिळण्याचा आशावाद संचालकांना आहे.

स्टेट ट्रान्स्पोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेची (एस.टी. बँक) स्थापना १९५३ मध्ये झाली. आशिया खंडात सर्वात मोठी असलेल्या या बँकेची आर्थिक स्थिती बिघडत चालल्याने ठेवी आणि कर्ज वाटपाचे गणित बिघडले आहे. राज्यभरातील संचालकांची दर पंधरा दिवसांनी या विषयावर चर्चा होत आहे. त्यासाठी विशेष उत्सव योजनेतून ५९ कोटी ३६ लाख रुपये जमा झाले आहेत. एका लाखाला ८.७५ टक्के व्याज दराची योजना आणली आहे. त्यामुळे पुढील सहा महिन्यात बँकेची आर्थिक स्थिती पूर्ववत होईल, असा विश्वास राज्यातील संचालकांना आहे. सध्या कर्ज मिळत नसल्याने सभासद हवालदिल आहेत. पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाड्यातील बँकेच्या शाखेत गेल्या चार महिन्यात ४ कोटी रुपयांच्या ठेवी जमा झाल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

नोकरभरतीचे दुखणे

एसटी बँकेतील नोकरभरती संदर्भात एसटी संघटना आणि बँक संचालकात धुसफूस सुरू आहे.आजी, माजी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची मुले, रोजंदारी कर्मचारी, काही खासगी उमेदवारांची नेमणूक राज्यातील शाखेत आहे.

५० शाखांत एकूण ४१० कर्मचाऱ्यांची मागणीराज्यातील ५० शाखेत कामकाजासाठी एकूण ७०० कर्मचाऱ्यांची गरज आहे. सध्या २९० कर्मचारी कार्यरत असून अजून ४१० कर्मचारी लागणार आहेत. अत्याधुनिक सुविधाही बँकेत नाहीत.

ठेवी परत मिळवू : घाटगेबँकेतून गेलेल्या ठेवी पूर्ववत करण्याचे कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. बँकेची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर कर्ज वाटप सुरू होईल. कोल्हापूर आणि गडहिंग्लज शाखेतही कोट्यवधी रुपयांच्या ठेवी जमा होत आहेत. - संजय घाटगे, संचालक एसटी बँक

 

  • कोल्हापूर, गडहिंग्लज आर्थिक स्थिती
  • कर्जे : ९५ कोटी ९३ लाख रुपये
  • ठेवी : ७९ कोटी ६८ लाख रुपये

राज्यातील स्थिती

  • एकूण ठेवी २२०० कोटी
  • ठेवी काढल्या ४८० कोटी
  • कर्ज १७०० कोटी
  • ओव्हरड्राफ्ट ४०० कोटी
  • मध्यम मुदतीचे कर्ज ९५० कोटी

कर्ज वाटप बंदघरबांधणीचे ३० लाख, चारचाकी कर्ज, गृहोपयोगी कर्जाचे वाटप बंद आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbankबँक