बिद्रीत हनुमान मूर्ती प्रतिष्ठापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:23 IST2021-01-08T05:23:11+5:302021-01-08T05:23:11+5:30
सरवडे : बिद्री (ता. कागल) येथील जय हनुमान मंदिराची वास्तुशांती सोहळा, मूर्तीची प्रातिष्ठापना, कलशारोहणाचे पूजन प.पूज्य चिदानंद स्वामीजी ...

बिद्रीत हनुमान मूर्ती प्रतिष्ठापना
सरवडे : बिद्री (ता. कागल) येथील जय हनुमान मंदिराची वास्तुशांती सोहळा, मूर्तीची प्रातिष्ठापना, कलशारोहणाचे पूजन प.पूज्य चिदानंद स्वामीजी यांच्याहस्ते पार पडले.
मंगळवारी सकाळी मूर्तीची बिद्री कारखाना कार्यस्थळावरून मिरवणूक काढण्यात आली, तर बुधवारी सकाळी मंदिरामध्ये होमहवन, पूजा करण्यात आली. त्यानंतर चिदानंद स्वामीजी यांच्याहस्ते बारा वाजता मूर्तीची प्राणप्रातिष्ठापना करण्यात आली. राजेंद्र जितकर यांनी मांदिरास मूर्ति प्रदान केली.
यावेळी माजी सरपंच पांडुरंग पाटील, माजी उपसरपंच साजन पाटील यांच्यासह ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
..........
०७ बिद्री
फोटो
बिद्री (ता. कागल) येथे हनुमान मूूर्तीची प्राणप्रातिष्ठापना करताना प.पूज्य चिदानंद स्वामी, शेजारी साजन पाटील व ग्रामस्थ.
छाया-प्रशांत साठे