पन्हाळ्यातील क्रीडांगणासाठी धनिकांची बोली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:18 IST2021-06-01T04:18:23+5:302021-06-01T04:18:23+5:30

पन्हाळा शहरातील ६३९ व ६४० गट नंबरच्या पन्हाळा क्लब जवळील जागा क्रीडांगणासाठी राखीव आहेत या ठिकाणी तालुका क्रीडा महोत्सव ...

The bid of the rich for the playground in the panhala | पन्हाळ्यातील क्रीडांगणासाठी धनिकांची बोली

पन्हाळ्यातील क्रीडांगणासाठी धनिकांची बोली

पन्हाळा शहरातील ६३९ व ६४० गट नंबरच्या पन्हाळा क्लब जवळील जागा क्रीडांगणासाठी राखीव आहेत या ठिकाणी तालुका क्रीडा महोत्सव व खेळांच्या विविध स्पर्धा नेहमी होत असतात. याशिवाय पन्हाळा हा व्हाॅलीबाॅल खेळाचे जिल्ह्याचे केंद्र आहे यासाठी गेल्या वीस वर्षांपासून या दोन्हीही गट नंबरच्या जागा नगरपरिषदेने राखीव ठेवल्या.

या दोन्हीही गट नंबरमध्ये दोन धनिकांनी लाखमोलाची बोली लावत याठिकाणी वीकेंड घरे बांधण्याचे स्वप्न बघितले याला पन्हाळ्यातील झारीतले शुक्राचार्य सामील झाले हे सर्वच मुंबईपर्यंत धडकले, नव्या डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये ते आरक्षण उठवण्यात आले. पण त्याला अट घातली गेली नगरपरिषद सभागृहाचा ठराव पाहिजे, हा ठराव होऊ नये म्हणून सभागृहाचे विरोधी सदस्य माजी नगराध्यक्ष असिफ मोकाशी, वीणा बांदिवडेकर, माधवी भोसले, मिनाज गारदी, संध्या पोवार या पाच सदस्यांनी क्रीडांगण राहावे म्हणून खास सभेची मागणी केली.

Web Title: The bid of the rich for the playground in the panhala