वारणा दूध संघाच्या विस्तारीकरण प्रकल्पाचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:17 IST2021-07-01T04:17:26+5:302021-07-01T04:17:26+5:30

तात्यासाहेब कोरेनगर येथील श्री वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघास राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत मंजूर झालेल्या मुख्य दुग्धालयाचे ...

Bhumipujan of Warna Dudh Sangh expansion project | वारणा दूध संघाच्या विस्तारीकरण प्रकल्पाचे भूमिपूजन

वारणा दूध संघाच्या विस्तारीकरण प्रकल्पाचे भूमिपूजन

तात्यासाहेब कोरेनगर येथील श्री वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघास राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत मंजूर झालेल्या मुख्य दुग्धालयाचे नूतनीकरण व विस्तारीकरणाचा भूमिपूजन बुधवारी आमदार विनय कोरे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते.

वारणा दूध संघास राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत मुख्य दुग्धालय नूतनीकरण व विस्तारीकरणाचे काम होणार आहे. सकाळी मुख्य दुग्धालयात संघाचे उपाध्यक्ष एच. आर. जाधव यांच्या हस्ते विधिवत पूजा पार पडली. अध्यक्षस्थानी जिल्हा दुग्धव्यवसाय अधिकारी प्रकाश आवटे होते.

आमदार कोरे म्हणाले, वारणा दूध संघाची दैनंदिन दूध हाताळणी क्षमता साडेपाच लाख लिटर आहे. या प्रकल्पामुळे आता साडेसात लाख लिटर होणार आहे.

संघाचे कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी वारणा दूध संघाने नवनवीन योजना राबवून प्रगतीचे यशस्वी टप्पे गाठले असून, राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत या मंजूर प्रकल्पास सुमारे २३ कोटी ६७ लाख इतका खर्च येणार असून, पुढील काळात वारणा दूध संघात नवनवीन व अत्याधुनिक दूध प्रोसेसिंग प्रकल्प हाती घेणार असल्याचे येडूरकर यांनी सांगितले.

या वेळी आमदार कोरे, जिल्हा दुग्धव्यवसाय अधिकारी प्रकाश आवटे आदी मान्यवरांचा सत्कार कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी केला. याप्रसंगी सर्व संचालक, सांगलीचे दुग्धव्यवसाय अधिकारी नामदेव दवडते, बँक ऑफ इंडिया अमृतनगरचे मुख्य व्यवस्थापक अमित मिश्रा, संघाचे विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

फोटो ओळी-तात्यासाहेब कोरेनगर येथील वारणा दूध संघास राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत मंजूर झालेल्या मुख्य दुग्धालय नूतनीकरण व विस्तारीकरण प्रकल्पाचे भूमिपूजन आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते झाला. या वेळी जिल्हा दुग्धव्यवसाय अधिकारी प्रकाश आवटे, उपाध्यक्ष एच. आर. जाधव, कार्यकारी संचालक मोहन येडूरकर, अमित मिश्रा, नामदेव दवडते, संचालक मंडळ, अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Bhumipujan of Warna Dudh Sangh expansion project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.