शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

दख्खनचा राजा जोतिबा मालिकेचे कोल्हापूर चित्रनगरीत भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 15:59 IST

अभिनेते महेश कोठारे यांची निर्मिती असलेल्या ह्यदख्खनचा राजा जोतिबाह्ण या आगामी मालिकेचा भूमिपूजन सोहळा रविवारी कोल्हापूर चित्रनगरीत पार पडला. या मालिकेसाठी भव्य सेट उभारण्यात येणार असून प्रत्यक्ष चित्रीकरणाला १५ सप्टेंबरपासून सुरुवात होईल.

ठळक मुद्देदख्खनचा राजा जोतिबा मालिकेचे चित्रनगरीत भूमिपूजन महेश कोठारे यांची निर्मिती : १५ सप्टेंबरपासून चित्रीकरण

कोल्हापूर : अभिनेते महेश कोठारे यांची निर्मिती असलेल्या ह्यदख्खनचा राजा जोतिबाह्ण या आगामी मालिकेचा भूमिपूजन सोहळा रविवारी कोल्हापूर चित्रनगरीत पार पडला. या मालिकेसाठी भव्य सेट उभारण्यात येणार असून प्रत्यक्ष चित्रीकरणाला १५ सप्टेंबरपासून सुरुवात होईल.चित्रनगरीत महेश कोठारे यांची नात छोट्या जीजाच्या हस्ते भूमिपूजन झाले. यावेळी स्वत: महेश कोठारे, नीलिमा कोठारे, आदिनाथ कोठारे, ऊर्मिला कोठारे, चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक संजय पाटील उपस्थित होते. महेश कोठारे यांचे कोल्हापूरशी खूप जुने व घट्ट नाते आहे. त्यांच्या प्रत्येक चित्रपटाचे चित्रीकरण कोल्हापुरातून होते. आता त्यांच्या ह्यकोठारे व्हिजनह्ण या निर्मिती संस्थेतर्फे १५ सप्टेंबरपासून या नव्या मालिकेचे चित्रीकरण कोल्हापुरात होत आहे. जोतिबा देवस्थानदेखील कोल्हापुरात आहे; त्यामुळेच मालिकेचे चित्रीकरणही येथेच होत आहे. पुढील किमान तीन-चार वर्षे हे चित्रीकरण चालेल.कोल्हापूर चित्रनगरीत या मालिकेचा भव्य सेट लवकरच उभा राहणार असून तो प्रख्यात कलाकार संतोष फुटाणे हे साकारत आहेत. ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवरून प्रसारित करण्यात येत आहे. कोठारे यांच्या या नव्या मालिकेतून कोल्हापुरात हजारो तंत्रज्ञांना काम मिळणार आहे, अशी प्रतिक्रिया चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक संजय पाटील यांनी व्यक्त केली.

या नव्या पौराणिक मालिकेसाठी कोठारे व्हिजन कामाला लागली आहे. जोतिबाची भूमिका आणि यातील कलाकार यांबद्दल उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यावेळी संतोष फुटाणे, अमर मोरे, अमेय हिंडलगे, स्टार प्रवाहच्या माधुरी पाटकर, अभिनेते आनंद काळे, महालक्ष्मी सिने सर्व्हिसचे मिलिंद अष्टेकर, सर्जेराव पाटील उपस्थित होते. 

टॅग्स :Adinath Kothareआदिनाथ कोठारेkolhapurकोल्हापूरStar Pravahस्टार प्रवाह