गडहिंग्लजमध्ये दिनकरराव शिंदे विद्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:19 IST2021-01-08T05:19:08+5:302021-01-08T05:19:08+5:30

गडहिंग्लज : गडहिंग्लज नगरपालिका शिक्षण मंडळाच्या दिनकरराव शिंदे मास्तर विद्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन ज्येष्ठ भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांच्या हस्ते ...

Bhumi Pujan of Dinkarrao Shinde Vidyalaya building at Gadhinglaj | गडहिंग्लजमध्ये दिनकरराव शिंदे विद्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन

गडहिंग्लजमध्ये दिनकरराव शिंदे विद्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन

गडहिंग्लज : गडहिंग्लज नगरपालिका शिक्षण मंडळाच्या दिनकरराव शिंदे मास्तर विद्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन ज्येष्ठ भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस उपस्थित होते.

शहरातील राजर्षी शाहू उद्यानासमोरील आणि उपजिल्हा रूग्णालयालगत असलेल्या पालिकेच्या विद्यालयासाठी आरक्षित असलेल्या जागेवर शाळेची इमारत उभारण्यात येणार आहे. यावेळी नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी यांनी दिनकरराव शिंदे यांचे कार्य आणि शाळेच्या वाटचालीविषयी माहिती दिली.

यावेळी दिनकरराव शिंदे स्मारक ट्रस्टतर्फे डॉ. देवी यांचा ट्रस्टी डॉ. एम. एस. बेळगुद्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्राचार्य डॉ. डी. एस. बाडकर, मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर, नगर अभियंता सुधीर पोतदार यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला उपनगराध्यक्ष महेश कोरी, कॉ. संपत देसाई, बाळेश नाईक, रामकुमार सावंत, नगरसेवक नरेंद्र भद्रापूर, उदय पाटील, नितीन देसाई, दीपक कुराडे, शशिकला पाटील, श्रद्धा शिंत्रे, नाज खलिफा, सुनीता पाटील आदी उपस्थित होते.

----------------------------------------------------

फोटो ओळी : गडहिंग्लज येथे शाळा इमारत बांधकामाचे भूमिपूजन डॉ. गणेश देवी यांनी केले. यावेळी श्रीपतराव शिंदे, नगराध्यक्षा स्वाती कोरी, राजन गवस, एम. एस. बेळगुद्री, रामकुमार सावंत आदी नगरसेवक उपस्थित होते. (किल्लेदार फोटो)

क्रमांक : ०६०१२०२१-गड-०१

Web Title: Bhumi Pujan of Dinkarrao Shinde Vidyalaya building at Gadhinglaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.