अंबाबाई मंदिर भक्त निवास इमारतीचे आज भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:22 IST2021-02-14T04:22:36+5:302021-02-14T04:22:36+5:30

कोल्हापूर : राज्यासह परराज्यातून करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी कोल्हापुरात येणाऱ्या भाविकांकरता पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतर्फे कपिलतीर्थ ...

Bhumi Pujan of Ambabai Mandir Bhakt Niwas building today | अंबाबाई मंदिर भक्त निवास इमारतीचे आज भूमिपूजन

अंबाबाई मंदिर भक्त निवास इमारतीचे आज भूमिपूजन

कोल्हापूर : राज्यासह परराज्यातून करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी कोल्हापुरात येणाऱ्या भाविकांकरता पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतर्फे कपिलतीर्थ मार्केटसमोर, ताराबाई रोड येथे सात मजली भक्त निवास बांधण्यात येणार आहे. त्याचे भूमिपूजन आज, रविवारी सकाळी ११.३० वाजता राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थित होणार आहे.

या भक्त निवासामधील पहिले तीन मजले पार्किंगकरता, तर वरील चार मजले हे भक्त निवासाकरता असणार आहेत. प्रत्येक मजल्यावर पाच रूमप्रमाणे २० रूम असणार आहेत. अशा या इमारतीच्या भूमिपूजनासाठी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार संभाजीराजे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थानचे अध्यक्ष महेश जाधव व सदस्य उपस्थित राहणार आहेत.

Web Title: Bhumi Pujan of Ambabai Mandir Bhakt Niwas building today