भुकेले यांनी वक्तृत्वाचे विद्यापीठ निर्माण केले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:17 IST2021-07-20T04:17:51+5:302021-07-20T04:17:51+5:30
गडहिंग्लज : डॉ. घाळी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून प्रा. शिवाजीराव भुकेले यांनी वक्तृत्वाचे विद्यापीठ निर्माण केले, असे गौरवोद्गार अखिल ...

भुकेले यांनी वक्तृत्वाचे विद्यापीठ निर्माण केले
गडहिंग्लज : डॉ. घाळी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून प्रा. शिवाजीराव भुकेले यांनी वक्तृत्वाचे विद्यापीठ निर्माण केले, असे गौरवोद्गार अखिल भारतीय वारकरी महामंडळाचे अध्यक्ष भाऊसाहेब पाटील-महाराज यांनी काढले.
येथील डॉ. घाळी महाविद्यालयाचे हिंदी विभागप्रमुख व नामवंत वक्ते प्रा. शिवाजीराव भुकेले यांच्या सेवानिवृत्ती गौरव सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. मंगलकुमार पाटील होते.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष किरण कदम, यशवंत कोले, अनिल उंदरे, अरविंद कुलकर्णी, अनिल मगर, आशपाक मकानदार, पी. डी. पाटील, रवींद्र खैरे, डॉ. स्वाती कमल यांची भाषणे झाली. प्रा. भुकेले व स्नेहा भुकेले यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमास माजी नगराध्यक्षा मंजूषा कदम, अरविंद कित्तुरकर, अॅड. अर्जुन रेडेकर, वसंत यमगेकर, प्रकाश तेलवेकर, नागेश चौगुले, किरण डोमणे, शैलेंद्र कावणेकर, डॉ. किरण खोराटे, प्रतापराव सरदेसाई, सूरज असवले, चंद्रकांत सावंत आदी उपस्थित होते.
सरला आरबोळे यांनी प्रास्ताविक केले. महेश कदम यांनी सूत्रसंचालन केले. नागेश मासाळ यांनी आभार मानले.
फोटो ओळी : गडहिंग्लज येथे सेवानिवृत्तीनिमित्त प्रा. शिवाजीराव भुकेले यांचा भाऊसाहेब पाटील यांच्या हस्ते सत्कार झाला. यावेळी प्राचार्य मंगलकुमार पाटील, अरविंद कित्तुरकर, स्नेहा भुकेले, मंजूषा कदम, किरण कदम, जयश्री तेली, रामभाऊ शिवणे आदी उपस्थित होते.
क्रमांक : १९०७२०२१-गड-०३