शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

..परंतु आम्ही 'तसे' कदापी होऊ देणार नाही, जरांगे-पाटील यांचे छगन भुजबळ यांच्यावर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2024 13:38 IST

कोल्हापूर : निवडणुकीच्या तोंडावर राजकीय नेते सत्तेसाठी रॅली काढत आहेत, त्यांच्या रॅली आरक्षणासाठी किंवा जनतेच्या प्रश्नासाठी नाहीत. बांगला देशासारखी ...

कोल्हापूर : निवडणुकीच्या तोंडावर राजकीय नेते सत्तेसाठी रॅली काढत आहेत, त्यांच्या रॅली आरक्षणासाठी किंवा जनतेच्या प्रश्नासाठी नाहीत. बांगला देशासारखी अराजकता महाराष्ट्रात आरक्षणावरून घडावी असे छगन भुजबळ यांच्यासह काहीजणांना वाटते, परंतु आम्ही कदापी तसे होऊ देणार नाही, कारण हे राज्य आमचे आहे, असे टीकास्त्र मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी शुक्रवारी सोडले. करवीरनिवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.मनोज जरांगे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, मराठा आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, एक मराठा लाख मराठा, अशा कार्यकर्त्यांच्या घोषणांच्या गजरात शुक्रवारी मराठा योद्धा जरांगे-पाटील करवीरनिवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले. तत्पूर्वी नर्सरीबागेतील समाधिस्थळावर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांसमोर ते नतमस्तक झाले. त्यांच्यासोबत अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष वसंतराव मुळीक होते.मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांचे आंदोलन सुरू आहे. शांतता रॅलीसाठी ते शुक्रवारी कोल्हापुरात आले होते. दुपारी छत्रपती शिवाजी महाराज चौकात मार्गदर्शन केल्यानंतर ते नर्सरी बागेतील शाहू महाराजांच्या समाधिस्थळावर आले. याठिकाणी समाधीच्या पायरीवर नतमस्तक होत त्यांनी शाहूंच्या समाधीवर पुष्पहार घालून त्यांना अभिवादन केले. अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी मराठ्यांना ओबीसीमधूनच आरक्षण मिळणार आहे, त्याला सुटी नाही असे ठणकावून सांगितले.यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष वसंतराव मुळीक होते. यावेळी जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील, मावळा ग्रुपचे अध्यक्ष उमेश पोवार, चंद्रकांत पाटील, नीलेश चव्हाण, संदीप पाटील, शाहीर दिलीप सावंत, सुशील भांदिगरे, अवधूत पाटील, मारुती मोरे, बंडोपंत चव्हाण, अमरसिंह पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलChagan Bhujbalछगन भुजबळ