नेसरी :करणी काढण्याच्या व गुप्त खजिना मिळवून देण्याच्या बहाण्याने नेसरी (ता. गडहिंग्लज) येथील महिलेवर अत्याचार व जादूटोणा करणाऱ्या सिरसंगी (ता. आजरा) येथील तथाकथित देवर्षी बाळूमामा तथा संशयित बाळू दळवी याला न्यायालयाने १८ डिसेंबरअखेर पोलिस कोठडी सुनावली.शनिवारी (१२) दळवीसह अन्य तिघांवर जादूटोणा व फसवणुकीचा नेसरी पोलिसात गुन्हा नोंद झाला होता. त्याच दिवशी त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. त्याची मुदत संपत असल्याने दळवी याला पुन्हा गडहिंग्लज न्यायालयात हजर केले असता आणखीन चार दिवसांची पोलिस कोठडीत देण्यात आली आहे. त्यामुळे पोलिसांना मूळ तपासाच्या दृष्टीने पाऊल टाकणे सोयीचे झाले आहे.गेले दोन दिवस याकामात तपास अधिकारी म्हणून काम पाहणारे उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे व नेसरीचे सहाय्यक पोलिस निरिक्षक अविनाश माने यांनी तपासाची चक्रे वाढवली असून भोंदू बाळू दळवीच्या कारनाम्याचे आणखी काही धागेदोरे मिळतात का त्या दृष्टीने तपास सुरू आहे.साक्षीदारांची माहिती व त्यांचे जाबजबाब नोंदविण्याचे काम सुरू आहे. यातील सिरसंगीतील दळवी यांचा दुसरा साथीदार संशयित लक्ष्मण सुतार याचा पोलिस कसून तपास करीत आहेत. तसेच या प्रकरणात सामील असणारे सावंतवाडीच्या दोघांचा सहभाग असल्याचे समजते.दळवीच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स तपासले जात असून दळवी याने आणखी किती जणांना आपल्या जाळ्यात फसविले आहे हे तपासाअंतीच स्पष्ट होणार आहे. दळवीच्या कारनाम्यात फसवणूक झालेल्यांनी धाडसाने पुढे येवून पोलिसात तक्रार द्यावी, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.
त्या भोंदूबाबाला शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 19:00 IST
Crime News, Police, Kolhapurnews करणी काढण्याच्या व गुप्त खजिना मिळवून देण्याच्या बहाण्याने नेसरी (ता. गडहिंग्लज) येथील महिलेवर अत्याचार व जादूटोणा करणाऱ्या सिरसंगी (ता. आजरा) येथील तथाकथित देवर्षी बाळूमामा तथा संशयित बाळू दळवी याला न्यायालयाने १८ डिसेंबरअखेर पोलिस कोठडी सुनावली.
त्या भोंदूबाबाला शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी
ठळक मुद्देत्या भोंदूबाबाला शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडीअन्य तीन आरोपींचा कसून शोध