भोगावतीचे ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:25 IST2021-07-30T04:25:11+5:302021-07-30T04:25:11+5:30

भोगावती कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामात ४ लाख ९२ हजार ४३ मेट्रिक टन ऊस गाळप केले होते. एफआरपीनुसार कारखान्याचा ऊसदर ...

Bhogawati sugarcane bill credited to farmers' accounts | भोगावतीचे ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

भोगावतीचे ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

भोगावती कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामात ४ लाख ९२ हजार ४३ मेट्रिक टन ऊस गाळप केले होते. एफआरपीनुसार कारखान्याचा ऊसदर प्रतिटन २ हजार ९७१ रुपये एवढा आहे. अंतिम टप्प्यातील १३ कोटी ७६ लाख ३७ हजार रुपये बिल ऊस उत्पादकांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आले आहे. कारखान्याचे यंदा एफआरपीनुसार उसाचे १४६ कोटी २२ लाख ६० हजार रुपये अदा केले आहेत.

ऊसतोडणी ओढणीच्या उर्वरित बिलापोटी ५ कोटी ८६ लाख ३९ हजार रुपये संबंधितांच्या खात्यावर वर्ग केले आहेत. हंगामात तोडणी ओढणी बिलांची रक्कम २१ कोटी ३४ लाख ६८ हजार रुपये अदा केली आहे. आगामी हंगामात कारखाना ६ लाख टन ऊस गाळप करणार असून सभासद व ऊस उत्पादकांनी आपला संपूर्ण ऊस कारखान्याकडे पाठवावा, असे आवाहन अध्यक्ष आ.पी.एन. पाटील, उदयसिंह पाटील यांनी केले आहे.

Web Title: Bhogawati sugarcane bill credited to farmers' accounts