भोगावती कॉलेजला नँक मूल्यांकन समिती भेट देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:25 IST2021-03-09T04:25:58+5:302021-03-09T04:25:58+5:30

कुरुकली (ता. करवीर) येथील भाेगावती महाविद्यालयाला आज, मंगळवारी व बुधवारी महाविद्यालयाची गुणवत्ता तपासणीसाठी नँक मूल्यांकन समिती भेट देणार आहे, ...

Bhogawati College will be visited by the Nank Assessment Committee | भोगावती कॉलेजला नँक मूल्यांकन समिती भेट देणार

भोगावती कॉलेजला नँक मूल्यांकन समिती भेट देणार

कुरुकली (ता. करवीर) येथील भाेगावती महाविद्यालयाला आज, मंगळवारी व बुधवारी महाविद्यालयाची गुणवत्ता तपासणीसाठी नँक मूल्यांकन समिती भेट देणार आहे, अशी माहिती भाेगावती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जयसिंगराव हुजरे, उपाध्यक्ष सर्जेराव पाटील व प्राचार्य डाॅ. दिनकर पाटील यांनी पत्रकार परिषेदत दिली.

या समितीमध्ये डाॅ. मझहिर किडवाई (कुलगुरू मंगलायतन विद्यापीठ दिल्ली) डाॅ. के. विद्यासागर (प्राेफेसर मिझाेराम विद्यापीठ मिझाेराम) व डाॅ. चैतन्य बाेरा (प्राचार्य तिनसुखिया काॅमर्स काॅलेज आसाम) यांचा समावेश करण्यात आला आहे. ही समिती महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभाग, क्रीडा विभाग, विविध विषयांचे विभाग, प्रयाेगशाळा, वसतिगहे, जलतरण तलाव, कार्यालय, इनडाेअर क्रीडा विभाग, कँटीन, क्रीडांगण, आदी ठिकाणी भेट देऊन मूल्यमापन करणार आहे.

Web Title: Bhogawati College will be visited by the Nank Assessment Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.