भीमराव माने शिवसेनेत

By Admin | Updated: August 11, 2014 00:44 IST2014-08-11T00:29:02+5:302014-08-11T00:44:38+5:30

मुंबईत कार्यक्रम : राष्ट्रवादीला आणखी एक धक्का

Bhimrao Mane Shivsenaet | भीमराव माने शिवसेनेत

भीमराव माने शिवसेनेत

सांगली : राष्ट्रवादीचे कवठेपिरान (ता. मिरज) जिल्हा परिषद गटातील सदस्य भीमराव माने यांनी आज, रविवारी शिवसेनेत प्रवेश केला. मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश झाला. त्यामुळे माने यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीला आणखी एक धक्का बसला आहे.
भीमराव माने हे ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक मानले जात होते. त्यांनी गत आठवड्यात ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली होती. त्यावेळी प्रवेशाबाबत प्राथमिक चर्चा झाली होती. आज पुन्हा माने यांनी मुंबईमध्ये ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी थेट प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. ठाकरे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी पश्चिम महाराष्ट्राचे संपर्कप्रमुख दिवाकर रावते, खासदार संजय राऊत उपस्थित होते. माने यांच्या शिवसेना प्रवेशामुळे कवठेपिरान व (पान १० वर)

राष्ट्रवादीत कार्यकर्त्यांची कोणतीही कामे होत नाहीत. हिंदकेसरी मारुती माने यांच्या स्मारकाच्या प्रश्नाकडे पक्षाने व जिल्ह्यातील नेत्यांनी दुर्लक्ष केले. याच मुद्द्यावर आम्ही पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनीही आमच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आम्ही पक्ष व नेत्यांवर नाराज आहोत. शिवसेनेत विनाअट प्रवेश केला आहे.
- भीमराव माने, जिल्हा परिषद सदस्य, कवठेपिरान

आणखी किती धक्के

जिल्ह्यात काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीलाच अधिक गळती लागली आहे. एकापाठोपाठ एक नेते महायुतीत जात असल्याने राष्ट्रवादीची चिंता वाढली आहे. मध्यंतरी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष दिनकर पाटीलही भाजपच्या संपर्कात होते. त्यांनी आता भाजपची संगत थोडी कमी केली आहे. दुसरीकडे, माजी मंत्री अजितराव घोरपडेही राष्ट्रवादीला अधिकृतरीत्या सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये जाण्याच्या तयारीला लागले आहेत.

परिसरातील राजकीय समीकरणे आता बदलणार आहेत. जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकून महायुतीत प्रवेश केल्यामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलत आहेत. यापूर्वी खासदार संजय पाटील, विलासराव जगताप यांनी भाजपला जवळ केले आहे. राष्ट्रवादीचे खानापूरचे माजी आमदार अनिल बाबर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर लगेचच जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक असलेले जिल्हा परिषद सदस्य भीमराव माने यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने राष्ट्रवादीला आणखी एक धक्का बसला आहे.

Web Title: Bhimrao Mane Shivsenaet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.