शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात हिंदू नेत्याची अपहरण करून निर्घृण हत्या, भारताने केला तीव्र निषेध
2
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? आम्हाला काहीच फरक पडणार नाही : शिंदेसेना
3
आजचे राशीभविष्य - २० एप्रिल २०२५, सर्व दृष्टींनी लाभदायी दिवस, सामाजिक क्षेत्रात सक्रीय राहाल
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटला; निकाल लागणार ८ मे रोजी, अनेक अडथळे पार करत १७ वर्षांनंतर सुनावणी पूर्ण
5
जमीन मोजणी हरकतीवर आता केवळ दोनच अपील, मोजणी नकाशे अपलोड झाल्यानंतरच अंतिम निकाल
6
जेलमधून बाहेर येताच त्याने युवतीला पुन्हा पळवून नेले, तलवारी-रॉडने घरावर केला हल्ला
7
राजची साद अन् उद्धवचा प्रतिसाद; मराठीच्या धुरळ्यात ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा
8
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण: हॉस्पिटलच्या व्यवहारातून बेदखल केल्याने होता तणाव
9
मित्राला वाचविताना दोन सख्ख्या भावांनी गमावला जीव; वेळास समुद्रकिनाऱ्यावर तिघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू
10
अवघ्या १७ दिवसांत ८३१ टन हापूस निर्यात; अमेरिकेला सर्वाधिक आंबा रवाना, युरोपाचीही पसंती
11
अवयवदात्याची स्वॅप रजिस्ट्री तयार करा, केंद्राच्या ‘नोटो’कडून सर्व राज्यांना सूचना
12
पावणेपाच लाखांचा घोटाळा; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीत बनावट कागदपत्रे, रुग्णनोंदी आढळल्या
13
अँटालिया स्फोटके प्रकरण: पोलिस अधिकारी काझीच्या दोषमुक्ततेस कोर्टाचा नकार, गुन्हेगारी कटाचा आरोप
14
कॅनडात बस स्टॉपवर भारतीय तरुणीची गोळीबारात हत्या; हल्लेखोरांना दुसऱ्यावर चालवायची होती गोळी
15
"ऑफर देणारे, अटी ठेवणारेही तेच, त्यामुळे मी..."; राज-उद्धव एकत्र येण्यावर CM फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
16
"जाऊ दे यार, कामाचं बोला"; राज-उद्धव एकत्र येण्याच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे चिडले
17
मला स्टार्क वैगेरे व्हायचं नाही; ऑस्ट्रेलियन स्टारशी तुलना केल्यावर आवेश खाननं असा दिला रिप्लाय
18
शेकापच्या संतोष पाटलांच्या दोन्ही मुलांचा वेळास बीचवर एकाच वेळी मृत्यू; बहिणीचा मुलगाही सुमद्रात बुडाला
19
"माय नेम इज खान"! LSG साठी आवेशची 'हिरोगिरी' यॉर्करचा मारा करत RR च्या हातून हिसकावून घेतला सामना
20
रशिया-युक्रेन युद्ध थांबले; तीन दिवस युद्धविराम जाहीर, व्लादिमीर पुतिन यांची घोषणा

Kolhapur News: भीमा कृषी व पशु प्रदर्शन उद्यापासून होणार खुले; १२ कोटींचा ‘बादशहा रेडा’, ‘बिजली म्हैस’ आकर्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2023 18:31 IST

गेली १५ वर्षे भीमा कृषी प्रदर्शनाचे आयोजन

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे भीमा कृषी व पशु प्रदर्शन उद्या गुरुवार (दि. २६) पासून मेरी वेदर मैदानावर खुले होणार आहे. यंदा १२ कोटींचा ‘बादशहा रेडा’, ३१ लिटर दूध देणारी ‘बिजली म्हैस’ हे प्रदर्शनाचे आकर्षण असणार आहे.खासदार महाडिक म्हणाले, शेतकऱ्यांना एकाच छताखाली आधुनिक तंत्रज्ञानासह शेतीतील प्रयोगाची माहिती मिळावी, यासाठी गेली १५ वर्षे भीमा कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. यामध्ये चारशे शेतीविषयक, तर दोनशे बचत गटांच्या स्टॉलचा समावेश आहे. त्याशिवाय प्रदर्शनात जातिवंत जनावरे पाहावयास मिळणार आहेत.गुरुवारी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून, शनिवारी (दि. २८) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते कृषी पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. रविवारी (दि. २९) प्रदर्शनाची सांगता होणार असल्याचे खासदार महाडिक यांनी सांगितले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, डॉ. जे. पी. पाटील, डॉ. अजित शिंदे, डॉ. अशोक पिसाळ, सुहास देशपांडे आदी उपस्थित होते.जगातील सर्वात उंच ‘बादशहा’मागील प्रदर्शनात नऊ काेटींचा ‘सुलतान’ रेडा सर्वांचे आकर्षण ठरला होता. तो मृत झाला असून, आता जगातील सर्वात उंच असणारा ‘बादशहा’ सलग तीनवेळा चॅम्पियन ठरला आहे. त्याला दहा किलो सफरचंद, २५ लिटर दूध, काजू, पिस्ता खाण्यास दिला जातो.‘तृणधान्यांचा स्वतंत्र स्टॉलपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदाचे ‘तृणधान्य’ वर्ष म्हणून घोषित केले असून, त्याचे औचित्य साधून प्रदर्शनात तृणधान्यांचे स्वतंत्र स्टॉल राहणार आहेत.‘मोती संवर्धन’ करणारा शेतकरीप्रदर्शनात भौगोलिक मानांकन प्राप्त २६ शेती उत्पादनाचा समावेश होणार असून, सडोली दुमाला (ता. करवीर) येथील एका शेतकऱ्याने ‘मोती संवर्धन’ केले आहे. त्याचा स्टाॅल खास आकर्षण राहणार आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर