भारत डेअरीचे संस्थापक धिरजलाल मेहता यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:26 IST2021-01-03T04:26:40+5:302021-01-03T04:26:40+5:30

कोल्हापूर : भारत डेअरीचे संस्थापक धिरजलाल मणिलाल मेहता (वय ८९) यांचे शनिवारी निधन झाले. ते राहात असलेल्या प्रतिभानगर, मेहता ...

Bharat Dairy founder Dhirajlal Mehta passes away | भारत डेअरीचे संस्थापक धिरजलाल मेहता यांचे निधन

भारत डेअरीचे संस्थापक धिरजलाल मेहता यांचे निधन

कोल्हापूर : भारत डेअरीचे संस्थापक धिरजलाल मणिलाल मेहता (वय ८९) यांचे शनिवारी निधन झाले. ते राहात असलेल्या प्रतिभानगर, मेहता कॉलनी येथून रविवारी सकाळी ८ वाजता त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, सून असा परिवार आहे.

धिरजलाल यांनी चार भावांसमवेत मंगळवार पेठेत १९४७मध्ये भारत डेअरीची स्थापना केली. त्यानंतर कोल्हापूर, इचलकरंजी, बेळगावमध्येही शाखा सुरु करण्यात आल्या. परिसरातील गावातून दूध संकलित करून त्यावर प्रक्रिया करून त्यांनी हा ब्रँन्ड विकसित केला. यानंतर शाखा विस्तार करण्यात आला. एमआयडीसीमध्ये १९८९मध्ये मोठा प्रकल्प उभारला. याचवेळी ‘स्फूर्ती’ हा ब्रॅण्ड बाजारात आणला. दुधाची दर्जेदार विविध उत्पादने त्यांनी बाजारात आणली. रोज २०० लीटर दुधापासून सुरु झालेला हा व्यवसाय आता दीड लाख लीटरपर्यंत पाेहोचला असून, यातून अनेकांना रोजगार मिळाला आहे.

फोटो : ०२०१२०२० कोल धिरजलाल मेहता निधन

Web Title: Bharat Dairy founder Dhirajlal Mehta passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.