शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
3
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
4
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
5
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
6
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
7
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
9
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
10
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
11
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
12
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
13
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
14
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
15
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
16
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
17
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
18
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
19
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
20
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!

मेतकेत भाविकांची मांदियाळी : भंडारा उत्सव -कैताळाच्या निनादात बाळूमामा, हालसिद्धनाथांचा जयघोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 11:20 PM

महाराष्ट्रासह कर्नाटकातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या मूळ क्षेत्र मेतके (ता. कागल) येथील श्री सद्गुरू बाळूमामा व श्री हालसिद्धनाथांचा भंडारा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. चिकोत्रा काठावर

ठळक मुद्देभंडारा उत्सव आजही बाळूमामा-हालसिद्धनाथ भंडारा म्हणून भाविक माघ पौर्णिमेला श्रद्धापूर्वक अमाप उत्साहात साजरा करतात.

म्हाकवे : महाराष्ट्रासह कर्नाटकातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या मूळ क्षेत्र मेतके (ता. कागल) येथील श्री सद्गुरू बाळूमामा व श्री हालसिद्धनाथांचा भंडारा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. चिकोत्रा काठावर भंडारा उत्सवाच्या निमित्ताने भाविकांची मांदियाळी आली होती. गेल्या सात दिवसांपासून सुरू असणाऱ्या या भंडारा उत्सवासाठी सीमाभागातून दीड लाखाहून अधिक भाविक दाखल झाले होते.

सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांगभलं.... श्री हालसिद्धनाथ महाराज की जय...असा अखंड नामघोष ढोल, कैताळाचा निनाद, पालखी सोहळा पाहून हजारो भाविक आत्मतृप्त होत होते. भंडाºयाची उधळण केल्यामुळे मंदिर परिसर पिवळा जर्द झाला होता, तर अखंड नामघोष व ढोल, कैताळाच्या निनादामुळे चिकोत्रा नदीकाठ दणाणून गेला होता. १९३२ मध्ये सर्व ग्रामस्थ व परिसरातील भाविक यांच्या सहकार्यातून बाळूमामांनी येथील हालसिद्धनाथ देवाचा भंडारा उत्सव सुरू केला. बाळूमामांनी स्वत: जाऊन मेतके परिसरातील चाळीस गावांतील नागरिकांना या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले. त्यामुळे पहिल्याच भंडारा उत्सवाला भाविकांची मांदियाळी उसळली होती. आणि तोच भंडारा उत्सव आजही बाळूमामा-हालसिद्धनाथ भंडारा म्हणून भाविक माघ पौर्णिमेला श्रद्धापूर्वक अमाप उत्साहात साजरा करतात.

भंडारा उत्सवामध्ये काकड आरती, प्रवचन, कीर्तन, ज्ञानेश्वरी पारायण, भजन व वालंग (ढोलवादन) यामुळे सात दिवसांपासून या पवित्र चिकोत्रा नदीतीरावर भावभक्तीचा मेळाच जमलाहोता. या उत्सवाचा सोमवारी मुख्य दिवस होता. रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता नाथांचे भक्तभगवान डोणे-वाघापुरे यांचे आगमन झाले, तर सायंकाळी सात वाजता गावच्या मुख्य चौकात बिरदेव व बाळूमामा यांच्या पालखीच्या गाठीभेटी झाल्या. तसेच, मिरज, बेडग, टाकळी, मालगाव, उदगाव, शिरोळ, उमळवाड, टोप, पेठवडगाव, घुणकी, म्हाकवे, कुर्ली, हमीदवाडा, मिणचे, सावर्डे, कारदगा, आदी गावांतील वालंगे समाजही दाखल झाला होता. यावेळी पालखी पूजन व देवाचा सबिना, तसेच धनगरी ढोलाचा वालंग व हेडाम खेळण्यात आले.सोमवारी आठ वाजता ज्ञानेश्वरी पारायणची सांगता झाली, तर, सकाळी १० वाजता महानैवेद्य होऊन सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सायंकाळी ५.३० वा. दिंडी सोहळा होऊन भंडारा उत्सवाची सांगता होऊन रात्री उशिरापर्यंत भाविक परतत होते.श्रद्धेपोटी राबले हजारो हातमेतके येथील भंडारा उत्सवासाठी येणाºया भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी सद्गुरू बाळूमामा चॅरिटेबल ट्रस्टने नेटके नियोजन केले होते. तर सर्व भाविकांना महाप्रसादाचा व्यवस्थित लाभ घेता यावा यासाठी तरुण मंडळाचे कार्यकर्ते विविध संस्था, ग्रामस्थ व ग्रामपंचायतीने परिश्रम घेतले. यामुळे हा भंडारा उत्सव सुरळीत पार पडला.मेतके येथील बाळूमामा-हालसिद्धनाथ भंडारा उत्सवातील प्रमुख असणाºया हेडाम खेळामध्ये भाविक दंग होते. दुसºया छायाचित्रात मंदिरामध्ये ढोल-कैताळ वादन करण्यात आले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर