भैरवनाथ जन्मोत्सव सोहळा साध्या पद्धतीने होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:19 IST2020-12-07T04:19:39+5:302020-12-07T04:19:39+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क खोची : येथील ग्रामदैवत व हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या भैरवनाथांचा जन्मोत्सव सोहळा आज, सोमवारी असून ...

Bhairavnath Janmotsav ceremony will be held in a simple manner | भैरवनाथ जन्मोत्सव सोहळा साध्या पद्धतीने होणार

भैरवनाथ जन्मोत्सव सोहळा साध्या पद्धतीने होणार

लोकमत न्यूज नेटवर्क

खोची : येथील ग्रामदैवत व हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या भैरवनाथांचा जन्मोत्सव सोहळा आज, सोमवारी असून तो साध्या पद्धतीने करण्यात येणार असल्याची माहिती सालकरी पुजारी, गुरव, गोसावी, नाथ समाजाकडून सांगण्यात आली.

आज, सोमवारी रात्री १२ वाजता भैरवनाथाचा जन्मोत्सव सोहळा आहे; परंतु कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी जन्मोत्सव सोहळा ठरावीक लोकांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. सोहळ्यानिमित्त होणारा महाप्रसादाचा कार्यक्रमही रद्द करण्यात आला आहे. जन्मोत्सव सोहळ्यानिमित पहाटे पूजाअर्चा, धूपारती, अभिषेक तसेच रात्री श्रींना पाळण्यात घालण्याचा कार्यक्रम साध्या पद्धतीने करण्यात येणार आहे; त्यामुळे भाविकांनी या सोहळ्यासाठी गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Bhairavnath Janmotsav ceremony will be held in a simple manner