बुडणाऱ्या मुलीस वाचविताना भादवणचा युवक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:21 IST2021-04-03T04:21:59+5:302021-04-03T04:21:59+5:30
अधिक माहिती अशी, स्वरा ही वडील डॉ. नीलेश अमृत गोडसे (रा. भादवण, ता. आजरा) येथे धरणावर गेली होती. ...

बुडणाऱ्या मुलीस वाचविताना भादवणचा युवक जखमी
अधिक माहिती अशी, स्वरा ही वडील डॉ. नीलेश अमृत गोडसे (रा. भादवण, ता. आजरा) येथे धरणावर गेली होती. पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने ती बुडू लागली. वडील गोडसेही सोबत पाण्यात होते. स्वरा बुडणार हे लक्षात आल्यावर त्यांनी आरडाओरड सुरू केली.
दरम्यान, यावेळी धरण परिसरात असणारे दत्तात्रय यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता तिला वाचविण्यासाठी पाण्यामध्ये उडी घेऊन तिचे प्राण वाचविले. त्यावेळी त्यांचा उजवा पाय दगडाला लागून गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी महागाव येथील रुग्णालयात दाखल केले आहे.
--------------------------
फोटो ओळी :
भादवण (ता. आजरा) येथील धरणात बुडणाऱ्या स्वरा गोडसे हिला वाचविताना जखमी झालेले दत्तात्रय खुळे.
क्रमांक : ०२०४२०२१-गड-१६