भादोलेला निधी कमी पडणार नाही : आमदार राजू आवळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:16 IST2021-06-23T04:16:18+5:302021-06-23T04:16:18+5:30
येथील जाधव व जामदार मळ्यातील वस्तीसाठी ये-जा करण्यासाठी पुलाची गरज होती त्या पुलाच्या व मुस्लीम समाजाच्या निवारा शेड ...

भादोलेला निधी कमी पडणार नाही : आमदार राजू आवळे
येथील जाधव व जामदार मळ्यातील वस्तीसाठी ये-जा करण्यासाठी पुलाची गरज होती त्या पुलाच्या व मुस्लीम समाजाच्या निवारा शेड उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते व विविधकामांच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी ग्रामविकास पॅनलचे नेते धोंडीराम पाटील होते.
यावेळी आवळे पुढे म्हणाले गेली अनेक वर्षे जाधव व जामदार वस्तीची पुलाची मागणी होती. परंतु एका वर्षात पूर्ण केली. तसेच मुस्लीम समाजाच्या निवारा शेडसाठी यासाठी १० लाखांचा निधी दिला आहे. येथून पुढे भादोले गावच्या व समाजाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही दिली.
यावेळी सरपंच आनंदराव कोळी, उपसरपंच आनंदराव सुतार धोंडीराम पाटील, सूर्यकांत पाटील, कपिल पाटील, सचिन पाटील, शहाजी घोलप, संभाजी घोरपडे, आनंदराव यादव, हर्षवर्धन माने, दादासोा जमादार, रियाज जमादार, रमेश पाटोळे, आयुब मुल्ला, धैर्यशील माने, अमर पाटील
दिलीप पाटील, अनिल जामदार, मन्सुर सनदे, आलताफ जमादार, रतन जामदार उपस्थित होते.
फोटो -भादोले - येथील पुलाच्या उद्घाटनप्रसंगी राजू आवळे, आनंदा कोळी, सूर्यकांत पाटील, धोंडीराम पाटील व मान्यवर.