कोरोनासह म्युकरमायकोसिसबाबत दक्ष राहा : समरजित घाटगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:22 IST2021-05-17T04:22:31+5:302021-05-17T04:22:31+5:30

कसबा सांगाव (ता. कागल) येथील प्राथमिक आरोग्य केंद्र भेटीवेळी ते बोलत होते. कागल तालुक्यामध्ये कसबा सांगाव व परिसर ...

Beware of mucomycosis with corona: Samarjit Ghatge | कोरोनासह म्युकरमायकोसिसबाबत दक्ष राहा : समरजित घाटगे

कोरोनासह म्युकरमायकोसिसबाबत दक्ष राहा : समरजित घाटगे

कसबा सांगाव (ता. कागल) येथील प्राथमिक आरोग्य केंद्र भेटीवेळी ते बोलत होते. कागल तालुक्यामध्ये कसबा सांगाव व परिसर कोरोना हॉटस्पॉट झाला आहे. याबाबत त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली.

कोरोना प्रतिबंधक लसीची उपलब्धता व लसीकरण याबाबतही त्यांनी माहिती घेतली.

यावेळी ते म्हणाले की, एकीकडे आपण सर्वजण कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी झुंज देत आहोत, तर दुसरीकडे म्युकरमायकोसिस हा फंगल इन्फेक्शनचा नवा आजार डोके वर काढत आहे. त्यामुळे नागरिकांसह कोरोनाशी दोन हात करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर याबाबत दक्षता घेण्याची मोठी जबाबदारी आली आहे. याबाबत सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी.

याप्रसंगी त्यांनी सांगाव आरोग्य केंद्र अंतर्गत काम करीत असलेल्या सर्वच कोरोना योद्ध्यांसह स्वयंसेवी संस्था, नागरिक यांचे ते करीत असलेल्या कार्याबद्दल कौतुक केले.

यावेळी वैद्यकीय अधिकारी पौर्णिमा शिंदे, लसीकरण विभाग प्रमुख आय. व्ही. कोळी, सरपंच रणजित कांबळे, राजे बॅंकेचे संचालक ॲड. बाबासाहेब मगदूम, सुदर्शन मजले, रणजित जाधव ,कुमार दिवटे, श्रीकांत माळी, आदी उपस्थित होते.

फोटो कॅप्शन :- कसबा सांगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे लसीकरणासाठी आलेल्या नागरिक व कोरोना योद्ध्यांशी संवाद साधताना शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे, सोबत सरपंच रणजित कांबळे.

Web Title: Beware of mucomycosis with corona: Samarjit Ghatge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.