सावधान, डेंग्यूचाही व्हायरस बदलतोय ! रुग्णसंख्येतही वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:26 IST2021-09-26T04:26:47+5:302021-09-26T04:26:47+5:30

कोल्हापूर : शहर आणि जिल्ह्यात साडेआठ महिन्यांत डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत. कोरोनाप्रमाणेच डेंग्यू आजाराचा व्हायरसही आता बदलत आहे. ...

Beware, the dengue virus is also changing! An increase in the number of patients | सावधान, डेंग्यूचाही व्हायरस बदलतोय ! रुग्णसंख्येतही वाढ

सावधान, डेंग्यूचाही व्हायरस बदलतोय ! रुग्णसंख्येतही वाढ

कोल्हापूर : शहर आणि जिल्ह्यात साडेआठ महिन्यांत डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत. कोरोनाप्रमाणेच डेंग्यू आजाराचा व्हायरसही आता बदलत आहे. त्याची वेगवेगळी लक्षणे समोर येत आहेत. परिणामी रुग्ण हैराण होत आहेत.

जानेवारी ते सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत तब्बल २५२ रुग्ण ग्रामीण आणि कोल्हापूर शहरात मिळाले आहेत. यामध्ये सर्वाधिक १८३ रुग्ण कोल्हापूर शहरातील आहेत. शहरातील अनेक प्रभागांत आणि ग्रामीण भागात एका कुटुंबात अनेक रुग्ण सापडत आहेत. गेल्या महिन्यात शहरातील एकाचा डेंग्यूने मृत्यूही झाला आहे. जूनपासून डेंग्यूचे रुग्ण सापडण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. अजूनही त्याचा फैलाव कायम आहे. त्याची पारंपरिक लक्षणांत बदल झाल्याचे डॉक्टर सांगतात.

१) डेंग्यूचे रुग्ण : २५२

जानेवारी ते ऑगस्ट २०२१ -२०८

१ ते २२ सप्टेंबर - ४४

२) हे बदल काळजी वाढविणारे (दोन बॉक्स. डॉक़्टरांशी बोलून हे बॉक्स करावेत)

ताप नसताना पॉझिटिव्ह

काही रुग्णांना ताप नाही, तरी डेंग्यूच्या आजाराची लागण झाल्याचे समोर येत आहे. प्लेटलेटस् कमी नाही, तरी पॉझिटिव्ह असेही काही रुग्णांच्या बाबतीत झाले आहे. स्नायूदुखी, सांधेदुखी, उलट्या होणे, तीव्र डोळेदुखी, अशक्तपणा अशी लक्षणेही रुग्णात आढळत आहेत. यामुळे रुग्णांनी गाफील न राहता, वेळीच निदान करून उपचार करून घ्यावेत, असे आवाहन आरोग्य प्रशासन करीत आहे. डेंग्यू आजाराची लक्षणे आणि काय काळजी घ्यावी, यासंबंधीची जनजागृतीही केली जात आहे.

३) पॅथाॅलॉजिस्ट काय म्हणतात ?

डेंग्यू आजाराचीही लक्षणे बदलत आहेत. सौम्य लक्षणे असली तरी अहवाल पॉझिटिव्ह येत आहे. ताप नाही, प्लेटलेट कमी झाले नाहीत; पण त्या रुग्णास डेंग्यूची बाधा झाल्याचे येथील पॅथाॅलॉजिस्टचे म्हणणे आहे.

४) कोट

पावसामुळे अनेक ठिकाणी साचलेल्या पाण्यात डासांची निर्मिती मोठ्या प्रमाणात झाली आहे. एडीस इजिप्ताय डासापासून डेंग्यू आजार बळावतो आहे. घरात आणि परिसरातील साठलेल्या पाण्यात या डासांची उत्पत्ती होते. यामुळे घर, परिसरात स्वच्छता राखावी. डेंग्यूची कोणतीही लक्षणे जाणवल्यास संबंधितांनी त्वरित तपासणी करून घ्यावी.

विनोद मोरे, जिल्हा हिवताप अधिकारी

Web Title: Beware, the dengue virus is also changing! An increase in the number of patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.