क्रिकेट सामन्याचे बेटिंग; दोघांना अटक
By Admin | Updated: April 25, 2015 00:44 IST2015-04-25T00:37:12+5:302015-04-25T00:44:24+5:30
तेरा मोबाईल संच, एक अल्टो कार आणि दहा हजार ७३५ रुपयांची रोख रक्कम पोलिसांनी केली जप्त

क्रिकेट सामन्याचे बेटिंग; दोघांना अटक
इचलकरंजी : क्रिकेट सामन्यावर बेटिंग घेतल्याच्या कारणावरून आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गांधीनगरमधील दोघांना अटक केली आहे. येथील एका हॉटेलवर छापा टाकून त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली. या कारवाईमध्ये तेरा मोबाईल संच, एक अल्टो कार आणि दहा हजार ७३५ रुपयांची रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली.
गुरुवारी रात्री उशिरा मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली डेअरडेविल्स हा आयपीएलचा सामना सुरू असताना पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने येथील श्रीराम हॉटेलवर छापा टाकून राकेश लालचंद नागदेव (वय ३२) व शंकर मनोहरलाल डेबानी (३५, दोघे रा. कोयना कॉलनी, गांधीनगर) यांना ताब्यात घेतले.