स्टार १२०३ वंशाच्या दिव्यापुढे ‘बेटी बचाव’हरली, मुलींचा जन्मदर घटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:26 IST2021-09-23T04:26:28+5:302021-09-23T04:26:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर मुलगा किंवा मुलगीमध्ये भेद करू ...

स्टार १२०३ वंशाच्या दिव्यापुढे ‘बेटी बचाव’हरली, मुलींचा जन्मदर घटला
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर मुलगा किंवा मुलगीमध्ये भेद करू नका, असे गेली अनेकवर्षे वेगवेगळ्या माध्यमातून सांगितले जात असले, तरी या मोहिमेला अजूनही १०० टक्के यश आलेले नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील जन्मदराच्या आकडेवारीवरून अजून मोठा पल्ला गाठावा लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे. ऑगस्ट २०२१ अखेरच्या मुला-मुलींच्या जन्मदर पाहता केवळ चंदगड तालुका वगळता सर्व तालुक्यांमध्ये मुलांपेक्षा मुलींच्या जन्माचे प्रमाण कमी आहे.
‘वंशाला दिवा पाहिजे’ या मानसिकतेतून वीस, पंचवीस वर्षांपूर्वीपर्यंत सहा-सहा मुली झाल्या तरी मुलाचा हट्ट सोडला जात नसे. आजही यामुळे अनेक घरांत सहा, सात मुलांनंतर मुलगा झाल्याची उदाहरणे आहेत. मुलगाच पाहिजे म्हणून गर्भपातासही बंधने घालण्यात आली असून, कायद्यान्वये लिंग निदान करण्यासाठी बंदी घालण्यात आली आहेत, तरीही अजून काही ठिकाणी चोरून, बेकायदेशीररीत्या गर्भलिंग निदान करण्याची प्रकरणे सुरू आहेत.
चौकट
१ हजार मुलांमागे मुली किती
२०१७........८९३
२०१८........८७२
२०१९........८९९
२०२०........९२३
ऑगस्ट २०२१ पर्यंत......९३४
चौकट
मुला-मुलींच्या जन्माची संख्या
सन मुले मुली
२०१७.... .२७,१६२ २४,२४५
२०१८ २४,१२१ २१,०३५
२०१९ १७०५६ १५३३७
२०२० १९,२०१ १६,६९६
ऑगस्ट २०२१ पर्यंत १०,४१५ ९,११७
चौकट
लिंग निदानास बंदी
शासनाने कायदा करून लिंग निदान करण्यास बंदी घातली आहे. तसे फलक रुग्णालयात लावणे बंधनकारक आहे. यासाठी वेळोवेळी जनजागरण करण्यात येते. त्यातूनही तक्रारी आल्यानंतर किंवा माहिती मिळाल्यानंतर बेकायदेशीररीत्या गर्भलिंग निदान करणाऱ्यांच्या रुग्णालयांवर कारवाई करण्यात येते.
कोट
जिल्ह्यातील चंदगड, शाहूवाडी, राधानगरी या तालुक्यांमध्ये मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढत आहे. नागरी तालुके याबाबतीत मागे असल्याचे दिसून येते. यासाठी शासकीय पातळीवर जनजागरण सुरू आहे. हळूहळू मानसिकता बदलत असून मुलींचा जन्मदर वाढत असल्याचेही दिसून येत आहे.
डॉ. योगेश साळे
जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर
२२०९२०२१ कोल १२०३ डमी