शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

कोल्हापूर : ‘लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी’: कौशल इनामदार , अक्षरगप्पांचा शतकमहोत्सवी कार्यक्रमाला उंदड प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 17:13 IST

‘लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य, ऐकतो मराठी’ या मराठी अभिमान गीताची आनंदयात्रा सोमवारी सांयकाळी येथील राम गणेश गडकरी सभागृहामध्ये रंगली.अक्षर दालन आणि निर्धार यांच्या तर्फे आयोजित अक्षरगप्पांच्या शताब्दीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देअक्षर दालन आणि निर्धार यांच्या तर्फे आयोजित अक्षरगप्पांच्या शताब्दीनिमित्त कार्यक्रमराम गणेश गडकरी सभागृहामध्ये रंगली मराठी अभिमान गीताची आनंदयात्रा

कोल्हापूर : ‘लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य, ऐकतो मराठी’ या मराठी अभिमान गीताची आनंदयात्रा सोमवारी सांयकाळी येथील राम गणेश गडकरी सभागृहामध्ये रंगली.अक्षर दालन आणि निर्धार यांच्या तर्फे आयोजित अक्षरगप्पांच्या शताब्दीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मराठी भाषेविषयी आणि वास्तवाबाबत भाष्य करतानाच संगीतकार कौशल इनामदार यांनी त्यासाठी महाराष्ट्राचे नागरिक म्हणून आपण ही जबाबदारी पाड पाडली पाहिजे, असे आवाहन केले.एका मोबाईल कंपनीला फोन केल्यानंतर त्यांनी आम्ही मराठीत बोलू शकत नसल्याचे मुंबईत सांगणे, एका रेडिओ वाहिनीने आम्ही मराठी गाणी लावत नाही असे स्पष्टपणे सांगितल्याने माझा स्वाभिमान दुखावला व त्यातूनच मराठी अभिमान गीताची कल्पना सूचल्याचे इनामदार यांनी सांगितले.

अक्षर दालन आणि निर्धार यांच्यातर्फे आयोजित अक्षरगप्पांच्या शताब्दीनिमित संगीतकार कौशल इनामदार यांचा सोमवारी येथील राम गणेश गडकरी सभागृहामध्ये मराठी अभिमान गीतांच्या कार्यक्रमाला श्रोत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.(छाया : आदित्य वेल्हाळ)एकदा ही कल्पना सूचल्यानंतर दोन वर्षे यासाठी संशोधन आणि पाठपुरावा करीत तब्बल ११२ गायकांकडून हे गीत गाऊन घेतल्याचे सांगत त्यांनी या गीताच्या निर्मितीची चित्तरकथाच सांगितली. पुणे येथील मराठी साहित्य संमेलनात अमिताभ बच्चन यांनी या गीताच्या ओळी जाहीरपणे म्हटल्या. ही या अभिमान गीताला मोठी पावती दिल्याचे इनामदार यांनी सांगितले.मराठी भाषा संपत चालली आहे, अशी ओरड करण्यापेक्षा तिचा वापर वाढविला पािहजे. ती जबाबदारी आपल्यावरच आहे, असे सांगत इनामदार यांनी यावेळी अनेक उदाहरणे दिली. अस्मिता पांडे यांनी मुलाखत घेतली, तर मंदार गोगटे यांनी तबला साथ केली.यावेळी न्यू एज्युकेशन सोसायटीचे विनोदकुमार लोहिया, बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत जोशी, सचिव दिलीप बापट, ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे, दिनेश वालावलकर, प्रा. भारत खराटे, राम देशपांडे, श्रीकांत नाईक, रजनी हिरळीकर, केशव स्वामी, सदानंद साहित्य मंडळ, औदुंबर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. रवींद्र जोशी यांनी स्वागत, तर समीर देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. मंजिरी जोशी यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.कार्यक्रमाला ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, ‘गोकुळ’चे संचालक रवींद्र आपटे, डॉ. धनंजय गुंडे, सोनाली नवांगूळ, अनुराधा गुरव, अरुणा देशपांडे, अनमोल कोठाडिया, प्रभाकर कुलकर्णी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरmusicसंगीतcultureसांस्कृतिक