कोरोनाचा फायदा, शुभंकरोती पाठ अन् नमाजाचे पठण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:25 IST2021-09-23T04:25:55+5:302021-09-23T04:25:55+5:30

प्रत्येक धर्मातील संस्कारानुसार त्या धर्मामधील व्यक्ति आपले आयुष्य जगत असतो. वयाच्या प्रत्येक टप्प्यांवर पालक, कुटुंबीय, नातेवाइकांकडून विविध स्वरूपातील संस्कार ...

Benefit of Corona, Recitation of Shubhankaroti Annamaja! | कोरोनाचा फायदा, शुभंकरोती पाठ अन् नमाजाचे पठण!

कोरोनाचा फायदा, शुभंकरोती पाठ अन् नमाजाचे पठण!

प्रत्येक धर्मातील संस्कारानुसार त्या धर्मामधील व्यक्ति आपले आयुष्य जगत असतो. वयाच्या प्रत्येक टप्प्यांवर पालक, कुटुंबीय, नातेवाइकांकडून विविध स्वरूपातील संस्कार केले जातात. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या संस्कारांसाठी कुटुंबीय, मुलांना अधिक वेळ मिळाला आहे. यावेळेचा योग्य वापर करत बहुतांश घरांमध्ये त्यांच्या धर्मानुसार मुलांवर संस्कार रूजविण्यात येत आहेत. ऑनलाइन शिक्षण झाल्यानंतर सायंकाळी मुलांना शुंभकरोती, इतर श्लोक वाचन करण्यास वेळ मिळत असल्याचे कळंबा रोड येथील शीतल जोशी यांनी सांगितले. शाळा बंद असल्याने घरातील मुलांना अधिक वेळ मिळत असून, अभ्यासानंतरच्या वेळेत मुले कुराण, नमाज पठण शिकत असल्याचे जवाहर नगर येथील समीना अत्तार यांनी सांगितले. बायबलमधील देवाची वचने, प्रार्थना मुलांना शिकविण्यासाठी पुरेसा वेळ सध्या मिळत आहे. त्यातून धार्मिक संस्कार रूजविण्यास मदत होत असल्याचे गोकुळ शिरगाव येथील अभिजीत सुतार यांनी सांगितले.

प्रत्येक धर्मात संस्काराचे धडे

हिंदू : हिंदू धार्मियांचे संस्कार विधी हे सोळा संस्कार आहेत. ते संस्कार मानवी मूल्याशी निगडित आहेत. आयुष्यातील प्रत्येक टप्प्यांवर कुटुंबीय, गुरुंकडून ज्या वैदिक विधी करण्यात येतात, त्याचाही संस्कारामध्ये समावेश होतो.

मुस्लीम : मुस्लीम धर्मात बिस्मिला, निकाह, वफात, आदी संस्काराचा समावेश आहे. दिवसातून पाच वेळा नमाज पठण करणे. हज-मक्काला जाणे. जकात-गरीब, गरजूंना मदत करणे. रोजा-रमजान दरम्यान उपवास करणे.

ख्रिश्चन : बाप्तिस्मा, दृढीकरण, कम्युनियन, गुरूदीक्षा, विवाह, अत्याभंग, आदी साक्रमेंत (संस्कार) हे ख्रिश्चन धर्मात आहेत. साक्रमेंत याचा अर्थ जीवन आपल्यात घेणे. ख्रिस्त जीवनामध्ये सहभागी होणे.

पुरोहित म्हणतात...

कोरोना काळात मिळालेल्या जादा वेळेचा मुलांनी सदुपयोग करत शुभंकरोती, रामरक्षा, हनुमान चालिसा, स्वामी समर्थ नित्यपाठ, करूणात्रिपदी, श्लोक आदींचे वाचन, पाठांतर केले आहे. धार्मिक संस्कार रूजविण्याच्या दृष्टीने हे चांगले चित्र आहे.

-अनिरुद्ध जोशी

मौलाना म्हणतात...

इस्लाम धर्माचा प्रमुख धर्मग्रंथ असलेल्या पवित्र कुराणचे वाचन लहान मुलांना शिकविण्यात येत आहे. त्यांना नमाज पठण करण्याबाबतचे शिक्षणही देण्यात येत आहे. वयोगटानुसार त्यांना धार्मिक संस्कार, शिक्षण दिले जात आहे.

-इरफान खान

पास्टर म्हणतात...

पवित्र बायबल धर्मग्रंथाचे वाचन, पाठांतर मुले करत आहेत. या ग्रंथातील देवाची वचने त्यांच्याकडून लिहून घेतली जातात. त्यातून त्यांचे हस्ताक्षर सुधारण्यासह देवाची वचने पाठ होण्यास मदत होते. प्रभूची प्रार्थना, नवनवीन गीते त्यांना शिकविण्यात येतात. मुलांकडून विश्वशांती, कोरोनाची महामारी थांबण्यासाठी रोज प्रार्थना केली जाते.

-सचिन चिल्लैया

220921\22kol_1_22092021_5.jpg

डमी (२२०९२०२१-कोल-स्टार डमी १२०६)

Web Title: Benefit of Corona, Recitation of Shubhankaroti Annamaja!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.