शहरं
Join us  
Trending Stories
1
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
2
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
3
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
4
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
5
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
6
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
7
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
8
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
10
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
11
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
12
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
13
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
14
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
15
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
16
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
17
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
18
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
19
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
20
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग

लाडक्या बहिणी आमिषाला बळी पडणार नाहीत, नंदिनी बाभूळकर यांचा ‘महायुती’वर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 13:32 IST

गडहिंग्लज : राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. वर्षाच्या बालिकेपासून ते सत्तर वर्षाच्या वृद्धेचेही त्यातून सुटका झालेली नाही. त्याबद्दल समाजात ...

गडहिंग्लज : राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. वर्षाच्या बालिकेपासून ते सत्तर वर्षाच्या वृद्धेचेही त्यातून सुटका झालेली नाही. त्याबद्दल समाजात प्रचंड असंतोष असून, अत्याचाराकडे महिलांचे लक्ष जाऊ नये यासाठीच ‘लाडकी बहीण’ योजनेचे आमिष दाखवले जात आहे. मात्र, त्याला महिला बळी पडणार नाहीत, असा विश्वास डॉ. नंदिनी कुपेकर-बाभूळकर यांनी व्यक्त केला.हलकर्णी येथे आयोजित जनसंवाद मेळाव्यात त्या बोलत होत्या. उदय जोशी, रामराज कुपेकर, शिवाजी सावंत, शशीकला देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.बाभूळकर म्हणाल्या, राज्यातील शेतकरी, कामगार, महिला, युवक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, कंत्राटदार आणि शासकीय-निमशासकीय कर्मचारी सगळेच नाराज आहेत. प्रलंबित, न्याय मागण्यांसाठी राज्यभर आंदोलने सुरू आहेत. त्यामुळे महायुती सरकारचा पराभव अटळ आहे.यावेळी जब्बार मुल्ला, अबुबकर बाणदार, जानबा सावंत, महाबळेश्वर कापसे, आप्पासाहेब पाटील, श्रीशैल गोटुरे, भैरू खांडेकर, गणेश फाटक, बाबूराव पाटील, आयेशा बाणदार, आदी उपस्थित होते.

हलकर्णी भागाला पाणी देणारबाबासाहेब कुपेकर यांच्यामुळे हिरण्यकेशीच्या काठावरील शेतकऱ्यांच्या जीवनात सुखाचे दिवस आले. परंतु, ‘निलजी’च्या पुढे चित्रीचे लाभक्षेत्र नसल्यामुळे हलकर्णी भागातील जनतेला दरवर्षी पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. त्यामुळे तेरणी, येणेचवंडी, नरेवाडी या तलावांच्या पुनर्भरणाबरोबरच पूर्वभागातील जनतेला हक्काचे पाणी देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत, अशी ग्वाही डॉ. कुपेकर यांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरchandgad-acचंदगडPoliticsराजकारणWomenमहिलाladki bahin yojanaलाडकी बहीण योजनेचा