गौणखनिज उत्खननास आठ दिवसांत सुरुवात

By Admin | Updated: December 16, 2014 23:49 IST2014-12-16T23:12:31+5:302014-12-16T23:49:42+5:30

ज्ञानेश्वर खुटवड : जिल्हा बैठकीत मंजुरी मिळणार

Beginning in eight days of mining excavation | गौणखनिज उत्खननास आठ दिवसांत सुरुवात

गौणखनिज उत्खननास आठ दिवसांत सुरुवात

सिंधुदुर्गनगरी : मुंबई उच्च न्यायालयाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बंदी कायम केलेल्या २५३ गावे वगळता सिंधुदुर्गातील अन्य गावांतील गौणखनिज उत्खनन परवानगीची प्रक्रिया जिल्हा महसूल प्रशासनाने सुरू केली आहे. गुरुवारी होणाऱ्या जिल्हास्तरीय बैठकीमध्ये येणाऱ्या प्रस्तावांना मंजुरी दिली जाणार असून, येत्या आठ दिवसांत गौणखनिज उत्खननास अधिकृतपणे सुरुवात होणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांनी दिली.
गौणखनिज बंदीमधून जिल्ह्यातील काही गावांना उच्च न्यायालयाने वगळून या गावांत गौणखनिज उत्खननास परवानगी दिली होती. हा निर्णय आता सिंधुदुर्ग महसूल प्रशासनाकडे प्राप्त झाल्याने प्रशासनाने गौणखनिज उत्खनन परवानगी सुरू केली आहे.
दोडामार्ग तालुक्यात ५९ गावे असूनही सर्वच्या सर्व गावे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बंदी आदेशात समाविष्ट झाली आहेत, तर कस्तुरीरंगन समितीच्या अहवालात इको-सेन्सिटिव्ह म्हणून समाविष्ट असलेली १९२ गावे बंदी आदेशात आहेत. ही गावे वगळता प्रशासनाने अन्य गावांतील चिरे, काळा दगड, आदी गौणखनिज उत्खननास परवानगी देण्याची प्रक्रिया हाती घेतली आहे. बंदी उठलेल्या गावांमधील गौणखनिजाचे प्रस्ताव सादर करावेत, असे तलाठ्यांना आदेश देण्यात आले
आहेत. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती असून, या समितीसमोर जे प्रस्ताव येतील, त्यांना या सभेत मान्यता देण्यात येणार आहे. त्यानंतर संबंधित खाण व्यवसायाकडून महसूल भरून घेण्यात येणार आहे आणि त्यानंतर येत्या आठ दिवसांत अधिकृत उत्खननास सुरुवात होणार आहे. बांधकाम व्यवसायाला मिळणार उभारी खडी, चिरे, आदी खनिज बंदीमुळे विकासावर मोठा परिणाम झाला होता. (प्रतिनिधी)

Web Title: Beginning in eight days of mining excavation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.