गडहिंग्लजमध्ये शिवाजी चौक सुशोभिकरणास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 11:00 AM2021-02-22T11:00:18+5:302021-02-22T11:02:17+5:30

Gadhinglaj chouk muncipalty Carportration Kolhapur-गडहिंग्लज शहरातील शिवाजी चौकातील पुतळा आणि परिसराचे पालिकेतर्फे सुशोभिकरण करण्यात येणार आहे.शिवजयंतीच्या अौचित्यावर या कामाचा प्रारंभ झाला. माजी आमदार अ‍ॅड.श्रीपतराव शिंदे यांच्याहस्ते सुशोभिकरणाच्या कामास सुरुवात झाली. याकामी नगरपालिकेकडून १५ लाख रुपये खर्च केला जाणार आहे.

Beginning of beautification of Shivaji Chowk in Gadhinglaj | गडहिंग्लजमध्ये शिवाजी चौक सुशोभिकरणास प्रारंभ

गडहिंग्लज येथे शिवाजी चौकातील शिवरायांच्या पुतळा परिसराच्या सुशोभिकरणाचा प्रारंभ माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांच्या हस्ते झाला.यावेळी नगराध्यक्षा प्रा.स्वाती कोरो, उपनगराध्यक्ष महेश कोरी,हारूण सय्यद,दिलीप माने, बसवराज तुरबतमठ आदी उपस्थित होते.

googlenewsNext
ठळक मुद्देगडहिंग्लजमध्ये शिवाजी चौक सुशोभिकरणास प्रारंभ शहरातील जुना चौक : नगरपालिकेकडून १५ लाखांचा निधी

गडहिंग्लज : शहरातील शिवाजी चौकातील पुतळा आणि परिसराचे पालिकेतर्फे सुशोभिकरण करण्यात येणार आहे.शिवजयंतीच्या अौचित्यावर या कामाचा प्रारंभ झाला. माजी आमदार अ‍ॅड.श्रीपतराव शिंदे यांच्याहस्ते सुशोभिकरणाच्या कामास सुरुवात झाली. याकामी नगरपालिकेकडून १५ लाख रुपये खर्च केला जाणार आहे.

कोरी म्हणाल्या, जुन्या गडहिंग्लजमधील ऐतिहासिक शिवाजी चौकाच्या सुशोभिकरणामुळे शहराच्या वैभवात भर पडणार आहे.
याप्रसंगी दररोज पुतळ्याचे पुजन आणि पुतळा परिसराची स्वच्छता करणाऱ्या बसवराज तुरबतमठ यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी उपनगराध्यक्ष महेश कोरी, मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर राजेश बोरगावे, बसवराज खणगावे, हारुण सय्यद, उदय पाटील, नितीन देसाई, नरेंद्र भद्रापुर, उदय कदम, दिपक कुराडे, वीणा कापसे, सुनिता पाटील, शकुंतला हातरोटे, शशिकला पाटील, नाझ खलिफा, श्रद्धा शिंत्रे, सरीता भैसकर, लता पालकर, प्रकाश तेलवेकर, दिलीप माने, चंद्रकांत सावंत, बाळासाहेब भैसकर, रमेश पाटील, संजय गुरव आदी उपस्थित होते.

 

Web Title: Beginning of beautification of Shivaji Chowk in Gadhinglaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.