गडहिंग्लजमध्ये 'त्या' कामगारांचे भीक मागे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:05 IST2021-02-05T07:05:05+5:302021-02-05T07:05:05+5:30
गडहिंग्लज : थकित फायनल पेमेंट व ग्रॅच्युइटीच्या मागणीसाठी आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याकडून सेवानिवृत्त कामगारांनी सोमवारी (दि.२५) ...

गडहिंग्लजमध्ये 'त्या' कामगारांचे भीक मागे आंदोलन
गडहिंग्लज : थकित फायनल पेमेंट व ग्रॅच्युइटीच्या मागणीसाठी आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याकडून सेवानिवृत्त कामगारांनी सोमवारी (दि.२५) भीक मागो आंदोलन केले. याप्रश्नी मंगळवारपासून (दि. २६) कामगार आमरण उपोषण करणार आहेत.
येथील प्रांतकचेरीसमोर गेल्या १३ दिवसांपासून कामगारांनी धरणे आंदोलन सुरू ठेवले आहे. मात्र, प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे कामगारांनी यापूर्वी मूक फेरी, अर्धनग्न आंदोलन केले, तर सोमवारी शहरात फिरून भीक मागो आंदोलन केले. शहरातील व्यापारी, दुकानदार, फेरीवाले, पादचारी यांच्याकडून कामगारांनी भीक मागितली.
आंदोलनात चंद्रकांत बंदी, बाळासाहेब मोहिते, रणजित देसाई, लक्ष्मण देवार्डे, सुभाष पाटील, बाळासाहेब निळपणकर, बाबू खोत, मारुती नवलाज आदींसह सेवानिवृत्त कामगारांनी सहभाग घेतला आहे.
------------------------------------
* फोटो ओळी : थकित फायनल पेमेंट व ग्रॅच्युइटीच्या मागणीसाठी गडहिंग्लज साखर कारखान्याच्या सेवानिवृत्त कामगारांनी शहरात फेरी काढून भीक मागितली. (किल्लेदार फोटो)
क्रमांक : २५०१२०२१-गड-०३
------------------------------------