शिरोळ तहसीलसमोर भीक मागो आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:27 IST2021-08-21T04:27:16+5:302021-08-21T04:27:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिरोळ : शिरोळ तालुका पूरग्रस्त अन्याय निवारण समितीच्यावतीने शिरोळ तहसील कार्यालयासमोर शुक्रवारी चौथ्या दिवशी भीक मागो ...

शिरोळ तहसीलसमोर भीक मागो आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरोळ : शिरोळ तालुका पूरग्रस्त अन्याय निवारण समितीच्यावतीने शिरोळ तहसील कार्यालयासमोर शुक्रवारी चौथ्या दिवशी भीक मागो आंदोलन करून शासनाचा निषेध करण्यात आला. दरम्यान, पूरग्रस्तांच्या विविध मागण्यांबाबत आंदोलनाची व्याप्ती वाढविण्यासाठी सोमवारपासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष रामचंद्र डांगे यांनी दिली.
महापुरामुळे ४३ गावांमधील पूरग्रस्त सामान्य जनतेसह शेतकरी, शेतमजूर, व्यावसायिक यांच्या विविध मागण्यांसाठी शिरोळ येथे तालुका पूरग्रस्त अन्याय निवारण समितीच्यावतीने मंगळवारपासून धरणे आंदोलन सुरू आहे. धरणे आंदोलन तसेच चूल पेटओ, खर्डा-भाकरी आंदोलन झाले. त्यानंतर आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून भीक मागो आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात सुरेश सासणे, दगडू माने, भास्कर कुंभार, चांदसाहेब कुरणे, राजापूरचे सरपंच संजय पाटील, रघुवीर नाईक, किरण गावडे, सागर पोवार, रोहन कटावे, गणेश पुजारी, विनोद पुजारी, बाळासाहेब माळी, विजय पवार, सुनील इनामदार, शोभा पानदारे उपस्थित होते.
फोटो - २००८२०२१-जेएवाय-०४
फोटो ओळ - शिरोळ येथील तहसील कार्यालयासमोर पूरग्रस्त समितीच्यावतीने भीक मागो आंदोलन करण्यात आले.