कलाकारांच्या साक्षीने व्हा सखी सदस्य
By Admin | Updated: January 23, 2015 00:41 IST2015-01-23T00:31:35+5:302015-01-23T00:41:22+5:30
आजपासून प्रारंभ : श्रेयस तळपदे, अमृता खानविलकर, अभिजित सावंत यांची उपस्थिती

कलाकारांच्या साक्षीने व्हा सखी सदस्य
सांगली : मनोरंजनाचे नवे रंग भरतानाच अविस्मरणीय कार्यक्रमांची भेट यंदा सखी मंच सदस्यांना मिळणार आहे. आज (शुक्रवारी) सकाळी १० वाजता यंदाच्या नव्या योजनेचा प्रारंभ सिनेकलाकारांच्या साक्षीने होत आहे. अभिनेते श्रेयस तळपदे, अमृता खानविलकर आणि गायक अभिजित सावंत यांच्या उपस्थितीत सदस्य होण्याची सुवर्णसंधी यानिमित्ताने उपलब्ध झाली आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील महिलांसाठीची ही योजना शुक्रवारपासून सुरू होत आहे. सांगलीच्या भावे नाट्यगृहात सकाळी साडेअकरा वाजता सिनेकलाकारांच्या साक्षीने सदस्य होता येणार आहे. त्यामुळे या संधीचा लाभ घेण्यासाठी महिला सदस्यांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन ‘लोकमत’ परिवाराच्यावतीने करण्यात आले आहे. प्रारंभाच्या दिमाखदार सोहळ््याचे साक्षीदार होताना वर्षभर मनोरंजनाच्या विविक कार्यक्रमांचा आनंद लुटता येणार आहे. गतवर्षी ज्या महिलांनी सदस्य होऊन वर्षभर मनोरंजनपर कार्यक्रमांचा आस्वाद घेतला त्यांच्यासह नव्या सदस्यांनाही योजनेमध्ये सामावून घेतले जाणार आहे. सदस्य नोंदणीचा कार्यक्रम २३ जानेवारीपासून आठ दिवस इतक्या मर्यादित कालावधीसाठीच आहे. अनेक वैशिष्ट्यांनी यंदाची योजना सजली आहे. सदस्य नोंदणीसाठी रु.३५० इतके शुल्क असून नोंदणीवेळीच पाचशे रुपयांचा तीन कढर्इंचा सेट तसेच सांगलीच्या ‘सुवर्णस्पर्श’तर्फे अकराशे रुपये किमतीच्या दोन बांगड्या भेट म्हणून दिल्या जाणार आहेत. याशिवाय तब्बल ५ हजार रुपये किमतीची मोफत कुपन्स्, शंभर रुपये किमतीचे ‘माय डायट बुक’, एक लाखाचा अपघाती मृत्यू विमा, एक लाख साठ हजार रुपयांचा लकी ड्रॉ आणि राज्यस्तरीय लकी ड्रॉमधून ‘ह्युंडाई आयटेन’ कार जिंकण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.
कार्यक्रमाच्या ठिकाणी सदस्य नोंदणी केली जाणार आहे. याचवेळी अभिनेते श्रेयस तळपदे, अमृता खानविलकर व अभिजित सावंत उपस्थित राहणार असून, त्यांच्याहस्ते सखी मंच सदस्य नोंदणीस सुरुवात केली जाणार आहे. त्यामुळे महिलांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून सदस्य नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
सदस्य होण्यासाठी काय करावे...
सखी सदस्य होण्यासाठी महिलांनी ३५0 रुपये नोंदणी शुल्क भरावे.
सदस्यत्वाचा अर्ज भरून तो सांगलीतील ‘लोकमत’ कार्यालयाकडे जमा करावा.
सदस्य नोंदणीनंतर लगेचच सखी सदस्यांना ओळखपत्र, कूपन, तसेच भेटवस्तू देण्यात येईल.
सांगली, मिरजेतील कार्यालयांसह कमिटी मेंबर्सकडे अर्ज उपलब्ध आहेत.
सांगलीतील महिलांनी ‘लोकमत’ कार्यालय, कलाश्री आर्केड, राम मंदिरजवळ सांगली याठिकाणी संपर्क साधावा.
कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांकावरही (क्र. २६२५९६२, ९६0४0८८३८८, ८४८२८३६१८0) संपर्क साधता येईल.
कार्यालयीन वेळेत म्हणजे सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत नोंदणीसाठी संपर्क साधावा.
संगीत कार्यक्रमाने प्रारंभ
सखी मंच सदस्य नोंदणी अभियानाच्या प्रारंभानिमित्त भावे नाट्यगृहात उद्या शुक्रवारी २३ जानेवारी रोजी साडेअकरा वाजता ‘सारेगम’फेम प्रख्यात गायक मिलिंद कुलकर्णी व निवेदक राजकुमार मगदूम यांचा ‘जिंदगी एक सफर’ हा हिंदी-मराठी गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे.