‘हुसेन सागर’च्या धर्तीवर रंकाळ्याचे सुशोभीकरण

By Admin | Updated: July 16, 2015 00:50 IST2015-07-16T00:50:01+5:302015-07-16T00:50:01+5:30

आयुक्तांची पाहणी : १२५ कोटी रुपयांच्या नवीन आराखड्याबाबत घेतली माहिती

The beautification of Rankala on the lines of 'Husseen Sagar' | ‘हुसेन सागर’च्या धर्तीवर रंकाळ्याचे सुशोभीकरण

‘हुसेन सागर’च्या धर्तीवर रंकाळ्याचे सुशोभीकरण

कोल्हापूर : शहराचे ऐतिहासिक वैभव असलेल्या रंकाळ्याचे हैदराबाद येथील ‘हुसेन सागर लेक’च्या धर्तीवर सुशोभीकरण करण्याची योजना आयुक्त पी. शिवशंकर यांनी आखली आहे. राष्ट्रीय तलाव संवर्धन योजनेतून रंकाळ्याच्या सुशोभीकरणासाठी १२५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. त्या अनुषंगाने बुधवारी आयुक्त पी. शिवशंकर यांनी रंकाळा परिसराची अधिकाऱ्यांसह पाहणी केली.
संवर्धन योजनेतून पहिल्या टप्प्यात रंकाळ्यासाठी आलेल्या निधीतून तांबट कमान ते रंकाळा टॉवरपर्यंत पाईपलाईन टाकून रंकाळ्यात मिसळणारे सांडपाणी रोखण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या टप्प्यात संरक्षण कठड्यांची उंची वाढविणे, गाळ काढणे किंवा स्थूल ठेवण्यासाठी उपाययोजना, निर्गत पाण्याच्या व्हॉल्व्हची दुरुस्ती, पदपथ, सांडपाणी रोखणे, रंकाळ्याचे मजबुतीकरण करणे, आदींसाठी कामे केली जाणार आहेत. ही कामे कशा प्रकारे जलद गतीने करता येतील, याची आयुक्तांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली.
यावेळी उपायुक्त विजय खोराटे, सहायक आयुक्त उमेश रणदिवे, इस्टेट आॅफिसर संजय भोसले, जलअभियंता मनीष पवार, उपअभियंता एस. बी. कुलकर्णी, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

रंकाळ्यासाठीचा तयार करण्यात येत असलेला डीपीआर हा फक्त मजबुतीकरणासाठी नाही. हैदराबाद येथील हुसेन सागर लेक व लुंबती गार्डनच्या धर्तीवर रंकाळ्याचा विकास करण्याचा प्रयत्न आहे. येथे प्रशस्त गार्डन व लेझर शो हे आक र्षण असेल. अंबाबाई दर्शनासह इतर कोणत्याही कारणासाठी येणारा प्रत्येक पर्यटक रंकाळ्याला भेट देईलच. कोल्हापूरच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या या प्रोजेक्टवर काम सुरू केले जाईल.
- पी. शिवशंकर, आयुक्त

Web Title: The beautification of Rankala on the lines of 'Husseen Sagar'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.