बांधकामाच्या कारणावरून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:34 IST2021-06-16T04:34:10+5:302021-06-16T04:34:10+5:30

पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, राजाराम कुडापणे यांच्या घराचे बांधकाम मध्येच बंद करून भावकीतील एकनाथ कुडापणे यांच्या घराचे ...

Beaten for construction reasons | बांधकामाच्या कारणावरून मारहाण

बांधकामाच्या कारणावरून मारहाण

पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, राजाराम कुडापणे यांच्या घराचे बांधकाम मध्येच बंद करून भावकीतील एकनाथ कुडापणे यांच्या घराचे बांधकाम पूर्ण केले. म्हणून गोविंद व किरण गवंडी रा.मलकापूर यांना माझ्या घरांचे बांधकाम कधी पूर्ण करणार, असे वेळोवेळी विचारणा केली असता, शनिवारी १२ जून रोजी बेकायदेशीर जमाव करून अमेणी गावच्या पाण्याच्या टाकीजवळ गोविंद व किरण गवंडीसह सात जणांनी मोटार सायकलवरून येऊन राजाराम कुडापणे यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करून बेशुद्ध केले. शुद्धीवर आल्यानंतर आई, वडील व भगवान पाटील यांना फोन करून बोलावून घेतले. प्राथमिक औषधोपचार मलकापूर ग्रामीण रुग्णालयात करून पुढील उपचारांसाठी बांबवडेतील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.

Web Title: Beaten for construction reasons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.