‘बकरी ईद’ उत्साहात
By Admin | Updated: September 26, 2015 00:38 IST2015-09-26T00:32:45+5:302015-09-26T00:38:20+5:30
शुक्रवारी बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी केली़ विविध मशिदींमध्ये मुस्लिम बांधवांनी सकाळी नमाज पठण केले़ एकमेकांना आलिंगन देत ‘ईद’च्या शुभेच्छा दिल्या़

‘बकरी ईद’ उत्साहात
कोल्हापूर : शहरातील मुस्लिम बांधवांनी शुक्रवारी बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी केली़ विविध मशिदींमध्ये मुस्लिम बांधवांनी सकाळी नमाज पठण केले़ एकमेकांना आलिंगन देत ‘ईद’च्या शुभेच्छा दिल्या़ ईदनिमित्त मुस्लिम बांधवांनी आपले नातेवाईक तसेच मित्रपरिवाराला शिरखुर्म्याची मेजवानी दिली़ सालाबादप्रमाणे दसरा चौक येथील मुस्लिम बोर्डिंगच्या पटांगणावर सामुदायिक नमाज पठण करण्यात आले़ या ठिकाणी मुफ्ती इर्शाद कुन्नुरे यांनी पहिल्या जमातीचे नमाज पठण केले़ दुसऱ्या जमातीसाठी हाफिज आकिब बालेचाँद म्हालदार यांनी, तर तिसऱ्या जमातीसाठी मौलाना राहामतुल्ला कोकणे यांनी नमाज पठण केले़ यावेळी पोलीस उपअधीक्षक भारतकुमार राणे, लक्ष्मीपुरीचे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, सुशांत चव्हाण, बजरंग शेलार, नगरसेवक रमेश पोवार, मंजूर बागवान, समीर काझी, आदींनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या़ याप्रसंगी कोल्हापूरची व देशाची एकात्मता आणि सुखशांती अबाधित राहावी, यासाठी अल्लाहकडे प्रार्थना करण्यात आली़याप्रसंगी उपस्थित मान्यवरांना मुस्लिम बोर्डिंगचे उपाध्यक्ष आदिल फरास, संचालक मलिक बागवान, लियाकत मुजावर, हमजेखान शिंदी, हाजी मुसा पटवेगार, जहाँगीर अत्तार, साजिद खान, रफिक मुल्ला, पापाभाई बागवान यांच्या हस्ते शिरखुर्म्याचे वाटप करण्यात आले़ संस्थेचे प्रशासक कादरभाई मलबारी यांनी उपस्थितांचे स्वागत केले, अध्यक्ष गणी आजरेकर यांनी आभार मानले़ शहरातील कसाब मस्जिद, अकबर मोहल्ला (बडी मस्जिद) राजेबागस्वार मस्जिद , विक्रमनगर मस्जिद, कब्रस्तान मस्जिद, बाबूजमाल मस्जिद, मणियार मस्जिद, घुडणपीर मस्जिद, सदर बझार, आदी मशिदींमध्येही सकाळी नमाज पठण करण्यात आले़ (प्रतिनिधी)
दुष्काळाचे संकट दूर करण्याची प्रार्थना
महाराष्ट्रातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बकरी ईद साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन मुस्लिम पंचायततर्फे हाजी फ ारूक एम. कुरेशी यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत मुस्लिम बांधवांनी तिरंगा महल सर्वधर्मीयांसाठी ईद-मिलन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी मक्का येथील हज दुर्घटनेत मृत झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. दुष्काळाचे संकट दूर होण्यासाठी आणि विश्वशांतीसाठी अल्लाहकडे प्रार्थना करण्यात आली. नमाज पठण करण्यापूर्वी शहरातील विविध मोहल्ल्यांत श्रमदानाने साफसफ ाई करण्यात आली.