कचरा डेपोची आग रोखण्यासाठी नागरिकांकडून धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:01 IST2021-01-13T05:01:27+5:302021-01-13T05:01:27+5:30

(फोटो) लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : येथील सांगली नाका परिसरातील कचरा डेपोला वारंवार लागणारी आग ताबडतोब रोखावी, यासह अन्य ...

Bear agitation by citizens to prevent fire of garbage depot | कचरा डेपोची आग रोखण्यासाठी नागरिकांकडून धरणे आंदोलन

कचरा डेपोची आग रोखण्यासाठी नागरिकांकडून धरणे आंदोलन

(फोटो)

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : येथील सांगली नाका परिसरातील कचरा डेपोला वारंवार लागणारी आग ताबडतोब रोखावी, यासह अन्य मागण्यांसाठी सांगली नाका कचरा डेपो कृती समितीने नगरपालिकेच्या प्रवेशद्वारात एक दिवसाचे धरणे आंदोलन केले.

सांगली नाका परिसरातील कचरा डेपोला सतत आग लागत असल्याने तेथील नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. मोठ्या प्रमाणात कचरा साठून राहत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. याबाबत नगरपालिकेला कळवूनही कोणतीच कार्यवाही झाली नाही. दरम्यान, आग विझविण्यासाठी १८ जानेवारीपर्यंत कामगाराची नेमणूक करावी, याची जबाबदारी स्वच्छता निरीक्षकांकडे द्यावी, अशी आंदोलनकर्त्यांची मागणी आहे.

नगराध्यक्षा अलका स्वामी, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, मदन कारंडे यांनी आंदोलकांची भेट घेऊन माहिती घेतली. आंदोलनात डॉ. आरती कोळी, मंगल सुर्वे, शेखर पवार, नंदा साळुंखे, संकेत बागल, जीवन कोळी आदी सहभागी झाले होते.

(फोटो ओळी) ११०१२०२१-आयसीएच-०३

कचरा डेपो कृती समितीने नगरपालिकेच्या प्रवेशद्वारात एक दिवसाचे धरणे आंदोलन केले. नगराध्यक्षा अलका स्वामी, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, मदन कारंडे यांनी या आंदोलकांची भेट घेऊन माहिती घेतली.

(छाया-उत्तम पाटील)

Web Title: Bear agitation by citizens to prevent fire of garbage depot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.