लस घेऊन सुरक्षित राहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:22 IST2021-04-15T04:22:39+5:302021-04-15T04:22:39+5:30

पाचगाव : आम्ही मास्क वापरतो, तुम्हीही वापरा व कोरोना लस घेऊन स्वतःला सुरक्षित करा, असे आवाहन दक्षिणचे ...

Be safe with the vaccine | लस घेऊन सुरक्षित राहा

लस घेऊन सुरक्षित राहा

पाचगाव : आम्ही मास्क वापरतो, तुम्हीही वापरा व कोरोना लस घेऊन स्वतःला सुरक्षित करा, असे आवाहन दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांनी केले. ते पाचगाव येथे सुरू करण्यात आलेल्या कोविड लसीकरण केंद्राच्या उद्‌घाटनप्रसंगी बोलत होते.

पाटील म्हणाले, पाचगाव येथे कोविड लसीकरण केंद्राची उभारणी केली असून त्याचा या परिसरातील नागरिकांनी उपयोग करून घ्यावा.

पाचगावचे सरपंच संग्राम पाटील म्हणाले, पालकमंत्र्यांनी पाचगाव येथे कोविड लसीकरण केंद्र सुरू करून नागरिकांना सुविधा दिली आहे. प्रत्येक नागरिकांनी ही लस घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी उपसरपंच भाग्यश्री दळवी, नारायण गाडगीळ, संजय गांधी निराधारचे अध्यक्ष संजय पाटील उपस्थित होते.

फोटो: १४ पाचगाव लस केंद्र

ओळ :

पाचगाव येथे सुरू करण्यात आलेल्या कोविड लसीकरण केंद्राचे उद्‌घाटन आमदार ऋतुराज पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच संग्राम पाटील, उपसरपंच भाग्यश्री दळवी उपस्थित होते.

Web Title: Be safe with the vaccine