शहरं
Join us  
Trending Stories
1
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
2
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
3
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
4
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
5
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
6
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
7
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
8
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
9
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
10
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला
11
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
12
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
13
रवीना टंडनची काहीही चूक नाही? ती नशेत नव्हती? CCTV फूटेजमुळे समोर आली वेगळीच कहाणी
14
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
15
पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
17
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
18
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
19
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
20
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...

सावधान, गवे गावातच येताहेत! वनविभाग हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 11:49 PM

धामोड : बुरंबाळी-कानकेकरवाडी दरम्यानच्या दुर्गमानवाड रस्त्यावर मंगळवारी सकाळीच १२ ते १३ गव्यांचा एक कळप दिसल्याने येथील शेतकरी भयभीत झाले आहेत. या सर्व प्रकारामुळे वनविभागही हतबल

धामोड : बुरंबाळी-कानकेकरवाडी दरम्यानच्या दुर्गमानवाड रस्त्यावर मंगळवारी सकाळीच १२ ते १३ गव्यांचा एक कळप दिसल्याने येथील शेतकरी भयभीत झाले आहेत. या सर्व प्रकारामुळे वनविभागही हतबल झाला असून, ठोस उपायासाठी शेतकरीही आक्रमक झाला आह.

बुरंबाळी (ता. राधानगरी) येथील कानकेकरवाडी ते दुर्गमानवाड रस्त्यावरती मंगळवारी सकाळी जवळपास १३ गव्यांचा कळप येथील शेतकऱ्यांना दिसला. गवे गावच्या शिवारात आल्याची बातमी केळोशी (खुर्द), खातकरवाडी, पिंपरेचीवाडी, बुरंबाळी गावांतील ग्रामस्थांना समजताच त्यांनी डोंगरमाथ्यावरील या रस्त्याकडे धाव घेतली; पण काही वेळातच या कळपाने शिरगाव, कांबळवाडी, तरसंबळे शिवारमार्गे दुर्गमानवाड जंगलाच्या दिशेने पळ काढला.

या परिसरातील जंगलांना गेल्या चार ते पाच दिवसांपासून आगी लावण्याच्या प्रकारात वाढ झाल्याने जवळपास ९०० एकरांवरील जंगल आगीच्या भक्षस्थानी पडले आहे. त्यामुळे हे गवे चाºयाच्या शोधात आता गावशिवाराच्या दिशेनेच येतआहेत. या परिसरातील शेतकरी रात्रीच्यावेळी उसाला पाणी पाजण्यासाठी शेतात गेल्यावर त्यांना वेळोवेळी गव्यांचे दर्शन गेल्या १५ दिवसांपासून होत आहे. परिणामी, शेतकरी भीतीपोटी पाणी अर्धवट सोडूनच घरी धाव घेत आहेत. गव्यांनी फस्त केलेले पीक पाहून शेतकरी निराशही होत आहेत.हल्ल्याच्या भीतीने गावकऱ्यांमध्ये दहशतमोहितेवाडी येथील शेतकरी गेल्या सहा महिन्यांपूर्वी गव्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा गव्यांनी गावच्या दिशेने मोर्चा वळविल्याने परिसरातील शेतकरी भयभीत झाला आहे. 

शेतकऱ्यांनी गव्यांना शेतात येण्यापासून रोखण्यासाठी गावठी जनावरांचे मलमूत्र किंवा गोणपाटामध्ये खराब मिरच्या घालून त्याची धुरांडी होईल, अशा पद्धतीने शेताच्या बांधावरती ठेवावे, त्यामुळे गवे शेतात येणार नाहीत. - दिनेश टिपुगडे, वनरक्षक केळोशी, म्हासुर्ली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरforest departmentवनविभाग