शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

सावध रहा.. घरीच रहा.. अन्यथा रेल्वेमध्ये होणार आता क्वॉरंटाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 13:01 IST

प्रवीण देसाई -  कोेल्हापूर : देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने रेल्वे विभागाने क्वारंटाईन (विलगीकरण) कक्ष तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली ...

ठळक मुद्देक्वारंटाईन’साठी रेल्वेचे १८ डबे सज्जपुणे येथे १६२ बेड तयार करण्याचे काम सुरू : जिल्हा प्रशासनाकडून मागणी झाल्यास केव्हाही दाखल होणार

प्रवीण देसाई - 

कोेल्हापूर : देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने रेल्वे विभागाने क्वारंटाईन (विलगीकरण) कक्ष तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यामध्ये पुणे येथे कोल्हापूरसाठी १८ डब्यांच्या रेल्वे सज्ज असून यामध्ये १६२ बेड तयार केले जात आहेत. जिल्हा प्रशासनाने मागणी केल्यास ही रेल्वे केव्हाही कोल्हापुरात दाखल होऊ शकते.

कोरोनाच्या संकटात देशासह संपूर्ण जग सापडले आहे. रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यासाठी सरकारी हॉस्पिटलसह खासगी हॉस्पिटलमध्येही आयसोेलेशन कक्ष व क्वारंटाईन कक्षासाठी बेडची तयारी ठेवली जात आहे. त्याचबरोबर सरकारी वसतिगृहे, विद्यापीठ, शाळांमध्येही बेडची व्यवस्था केली जात आहे. हा प्रादुर्भाव वाढल्यास या इमारतीही कमी पडू शकतात. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने रेल्वेच्या डब्यांमध्ये क्वारंटाईन व आयसोलेशन कक्षासाठी तयारी ठेवली आहे. देशभरात हे चित्र आहे. पुणे मध्य रेल्वे विभागातही हालचाली सुरू असून रेल्वेच्या डब्यात क्वारंटाईन कक्ष तयार करायला सुरुवात झाली आहे.

काही दिवसांपूर्वी कोल्हापूर रेल्वे स्टेशन कार्यालयाकडून माहिती मागविण्यात आली होती. त्याचबरोबर स्टेशनमधील रेल्वेचे काही डबेही पुण्याला नेण्यात आले होते. त्यानुसार पुणे येथील वर्कशॉपमध्ये कोल्हापूरसाठी क्वारंटाईनकरिता १८ डब्यांच्या रेल्वेत १६२ बेड तयार करण्याचे काम सुरू आहे. जिल्हा प्रशासनाकडून मागणी झाल्यास १२ ते १४ तासांत पुण्याहून कोल्हापुरात ही रेल्वे दाखल होऊ शकते, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.‘रेल्वे’चा प्रशासनाला मदतीचाच हातकोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता रुग्णांना क्वारंटाईन करण्यासाठी हॉस्पिटलसह इमारतींमध्येही जागा अपुरी पडू शकते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने आपल्या पातळीवर डब्यांमध्ये क्वारंटाईन कक्ष तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या माध्यमातून ‘रेल्वे’ने शासन व प्रशासनाला मदतीचाच हात दिला आहे.एका डब्यात नऊ बेडएका रेल्वे डब्यात नऊ बेड याप्रमाणे १८ डब्यांमध्ये १६२ बेड तयार केले जात आहेत. आयसोेलेशन कक्ष व क्वारंटाईन कक्षामध्ये लागणाऱ्या व्हेंटिलेटरसह वैद्यकीय साहित्य ठेवण्याची व्यवस्था या कक्षांमध्ये केली जात आहे, असे सांगण्यात आले. 

टॅग्स :railwayरेल्वेkolhapurकोल्हापूरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस